पुणे, 24 ऑक्टोबर: मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने पार्थ पवार यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
या घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि इतर व्यक्तींशी असलेली ओळख, त्यांच्यातील संपर्क आणि जमिनीच्या व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्याकडे चौकशी करून माहिती घेतली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंढवा येथील ४० एकर जमीन ‘अमेडिया एंटरप्रायझेस’ला विकण्याच्या व्यवहारातून हा घोटाळा उघडकीस आला. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, शीतल किशनचंद तेजवानी यांच्याकडे २७२ जमीन मालकांचे मुखत्यारपत्र होते. याच मुखत्यारपत्राच्या आधारे त्यांनी विक्रीचा व्यवहार पूर्ण केला.
अमेडिया एंटरप्रायझेस या कंपनीत दिग्विजय अमरसिंह पाटील हे भागीदार आहेत. पार्थ पवार यांचाही या कंपनीशी संबंध असल्याने, या व्यवहाराशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींमधील संपर्काची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.
या जमीन व्यवहारात सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क न भरल्याचा आरोप आहे. चुकीचे आदेश दिल्याप्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, तर दस्तनोंदणी आणि मुद्रांक शुल्कात अनियमितता केल्याप्रकरणी निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र बालकृष्ण तारू यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आता या संपूर्ण व्यवहारात प्रत्येकाची नेमकी काय भूमिका होती, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एपस्टीन फाइल्सचा भारताच्या राजकारणावर परिणाम होणार, ट्रम्प यांचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंना हत्येची भीती; म्हणाले, ‘माझ्या घरावर हल्ला होऊ शकतो’
- मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा घणाघात; ‘शिंदे-फडणवीस लक्षात ठेवा, कर्मा रिटर्न्स!’
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








