प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांना आता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली नसती, तर एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात आला असता, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. जरांगे पाटील यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले, असा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला होता. यावरून वातावरण तापल्यानंतर रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.
भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत आहे का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी भाजपमधून कोणी घेतली आहे का, अशी विचारणा कदम यांनी केली होती. एकनाथ शिंदे विश्वासाने भाजपसोबत आले. मात्र भाजपचा प्लॅन कसा चालतो, पक्षाकडून पैसे न देता परस्पर दिले जातात आणि यात प्रवीण दरेकर यांचेही नाव आले आहे. भाजपने याचे उत्तर द्यावे, असे रामदास कदम म्हणाले होते.
या आरोपांवर तीव्र आक्षेप घेत नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम हे स्वतःच्या मनाने बोलत आहेत की याला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची मान्यता आहे? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महायुतीत फूट पडून विरोधकांना आनंद होईल. त्यामुळे कदम यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. दुसरीकडे, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनीही याच मुद्द्यावरून रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार
- रामदास कदम यांनी फालतू धंदे बंद करावेत; एकनाथ शिंदेंना पाठीमागे तुम्ही काय बोलता, याच्या क्लिप्स आमच्याकडे- प्रसाद लाड
- रामदास कदम म्हणजे क्रॅक जॅक संघटना; तूच बाटली पि, कशाची बाटली तुला कळेल, तुझ्याकडेच बार – मनोज जरांगे
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले, असा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता.
भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत आहे का आणि त्यांना संपवण्याची सुपारी भाजपमधून कोणी घेतली आहे का, अशी विचारणा रामदास कदम यांनी केली होती. तसेच पक्षाकडून पैसे न देता परस्पर दिले जातात आणि यात प्रवीण दरेकर यांचेही नाव आले आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला याचे उत्तर मागितले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली नसती, तर एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात आला असता, असा दावा नितेश राणे यांनी केला.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








