प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठे भाकीत केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या वादामुळे शिंदे एकदा मुख्यमंत्री झाले, मात्र आता ते पुन्हा या पदावर विराजमान होतील असे वाटत नाही, असा थेट दावा सदावर्ते यांनी केला आहे.
मंगळवारी राज्यभरात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. पंकजा मुंडे, नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील आणि मुंबईत ठाकरे व शिंदे गटाचे दसरा मेळावे पार पडले. या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. दसऱ्याच्या दिवशी शिंदेंच्या मेळाव्याकडून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तिथेही केवळ शिमगाच पाहायला मिळाला, असा टोला त्यांनी लगावला.
सदावर्ते यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावरही निशाणा साधला. ‘महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय?’ असा सवाल करत ते म्हणाले की, सण साजरा करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी लोकांना बोलावले जाते की शिव्याशाप ऐकवण्यासाठी? काल लोकांना हे सर्व त्रासदायक वाटत होते. तसेच, उदय सामंत यांनी यावेळी मनोज जरांगे यांचा उल्लेख ‘संघर्षयोद्धा’ किंवा साधे ‘दादा’ असा न करता केवळ ‘मनोज जरांगे पाटील’ असा केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना सदावर्ते म्हणाले की, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणे सोपे नाही. आता केवळ आपला मुलगा कॅबिनेट मंत्री होईल, अशी त्यांना आशा आहे. ‘मिलेगा मिलेगा’ असे सांगून लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. यापूर्वीही सदावर्ते यांनी शिंदेंवर टीका केली होती. आता त्यांच्या या ताज्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
Quick Answers
उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या वादामुळे शिंदे एकदा मुख्यमंत्री झाले, मात्र आता ते पुन्हा या पदावर विराजमान होतील असे वाटत नाही, असा थेट दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दसऱ्याच्या दिवशी शिंदेंच्या मेळाव्याकडून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तिथेही केवळ शिमगाच पाहायला मिळाला, असा टोला सदावर्ते यांनी लगावला.
सण साजरा करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी लोकांना बोलावले जाते की शिव्याशाप ऐकवण्यासाठी? असा सवाल करत सदावर्ते यांनी 'महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय?' असा निशाणा साधला.
सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणे सोपे नसून, आता केवळ आपला मुलगा कॅबिनेट मंत्री होईल, अशी त्यांना आशा आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








