बीड, 20 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील नारायणगडावर २० ऑक्टोबर रोजी मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सध्या शेतकरी मोठ्या संकटात असून, लढा उभा करायचा असेल तर त्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळालीच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करताना जरांगे म्हणाले, “शेतातील पीक गेलं असून सोयाबीन, ऊस आणि कापूस जळाला आहे. आता तोंडाला आलेला घास गेल्याने शेतकऱ्याच्या बांधावरही उभं राहावंसं वाटत नाही.” सध्याची परिस्थिती भयानक असून येत्या दोन महिन्यांत ती अधिक भीषण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, एकमेकांची मजा न बघता तहानलेल्यांना तांब्याभर पाणी देण्याचं आणि शेतकऱ्यांची लढाई सर्वांनी मिळून लढण्याचं आवाहन त्यांनी केले.
सरकारच्या आडमुठ्या धोरणांवर टीका करताना त्यांनी पाच प्रमुख मागण्या समोर ठेवल्या. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याचे सर्व पैसे थेट खात्यात जमा करणे, रखडलेले सर्व अनुदान देणे आणि गावागावांत चारा छावण्या उभारणे या मागण्यांचा समावेश आहे. जोपर्यंत यांच्या विरोधात बोलणार नाही, तोपर्यंत हे काहीही देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त करताना जरांगे यांनी समाजाला सावध केले. “ज्यांना तुम्ही मोठे केले, त्यापैकी एकही जण आपल्याकडे फिरकत नाही. त्यांनी स्वतःचे बंगले बांधले, जमिनी घेतल्या, पण समाज वाऱ्यावर सोडला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्याने फाशी घेतल्यास त्याची किंमत केवळ दीड लाख रुपये लावली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जो नेता किंवा पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत निवडून येऊ न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नारायणगडावर यावर्षी गर्दी कमी असल्याच्या मुद्द्यावर जरांगे यांनी स्पष्ट केले की, समाजातील ८० टक्के लोकांचे हातावर पोट असल्याने आधीच असा अंदाज होता. पाटोदा येथे आपल्याला तीन महिन्यांत सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीचा शब्द मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. “मी जिवंत असेपर्यंत तुमची ताकद वाढवत राहीन. समाजाची मान खाली जाईल असे एकही पाऊल मी आजवर उचलले नाही आणि भविष्यातही उचलणार नाही,” अशी ग्वाही जरांगे यांनी यावेळी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
- मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरून ‘मास्टरप्लॅन’; मराठा समाजासाठी तीन संपर्क क्रमांक जाहीर
- गोकुळ निवडणूक २०२६: सतेज पाटलांनी उलगडली महायुतीच्या १३-१२ पराभवाची ‘A टू Z’ कारणे
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची ठाम मागणी केली आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याचे सर्व पैसे थेट खात्यात जमा करणे, रखडलेले सर्व अनुदान देणे आणि गावागावांत चारा छावण्या उभारणे या ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत.
जो नेता किंवा पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत निवडून येऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
समाजातील ८० टक्के लोकांचे हातावर पोट असल्यामुळे गर्दी कमी असण्याचा अंदाज आधीच होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








