प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीअंतर्गत असलेली नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. उमेदवारीवरून सुरुवातीला दिसलेले मतभेद आता प्रचाराच्या टप्प्यावरही जाणवत आहेत. साताऱ्यात आयोजित एका मेळाव्यात बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी आपली खदखद उघडपणे व्यक्त केली. ‘अजितदादा गेल्यापासून आपल्याला गृहीत धरले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या पार पडत असलेल्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील उपस्थित होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यात महायुतीत सुरू असलेल्या धुसफुशीचा परिणाम या सभेवरही दिसला. स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला दांडी मारल्याने सभागृहातील बहुतांश खुर्च्या मोकळ्या असल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकर्त्यांच्या या अल्प उपस्थितीची दखल स्वतः मंत्री मकरंद पाटील यांना घ्यावी लागली. सभेला संबोधित करताना, आज नेहमीप्रमाणे उपस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.
याच मेळाव्यात मकरंद पाटील यांनी खंत व्यक्त करताना, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेल्यापासून आपल्याला महायुतीत गृहीत धरले जात असल्याची नाराजी बोलून दाखवली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनांबाबत कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही तीव्र भावना असल्याचे बैठकीत दिसून आले. परिणामी, मकरंद पाटील यांना नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत अखेर महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करावी लागली. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्ते किती मान देतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ निवडणूक निकाल २०२६: महायुती अन् हसन मुश्रीफांचे गणित कुठे चुकले? सतेज पाटलांनी सांगितले पराभवाचे कारण
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: ‘मुलाने मोठा गुन्हा केला’, आरोपी रेहानच्या वडिलांचा मोठा खुलासा
- ठाण्याच्या महापौरांच्या ड्रायव्हरची गुंडगिरी; पार्किंगच्या वादातून ‘एबीपी माझा’च्या कॅमेरामनला बेदम मारहाण
Quick Answers
मंत्री मकरंद पाटील यांनी 'अजितदादा गेल्यापासून आपल्याला गृहीत धरले जात आहे,' असा आरोप करत महायुतीबाबत आपली खदखद व्यक्त केली.
साताऱ्यात आयोजित बैठकीला मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला दांडी मारल्याने सभागृहातील बहुतांश खुर्च्या मोकळ्या असल्याचे पाहायला मिळाले.
मकरंद पाटील यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत शेवटी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.





