गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देवाची भीती घालून शपथा…’

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, शपथा आणि सहलींवरून विरोधकांना लक्ष केले आहे.

Published On: 

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

कोल्हापूर, 20 ऑक्टोबर: कोल्हापूरमधील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला असून आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलने महायुतीच्या नेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयानंतर सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपली पहिली मोठी प्रतिक्रिया देताना, देवाची भीती घालून दिलेल्या शपथांचा काहीही उपयोग झाला नसल्याचे म्हटले आहे.

या चुरशीच्या निवडणुकीत मतमोजणीच्या सुरुवातीला सतेज पाटील यांचे उमेदवार १५ जागांवर आघाडीवर होते. मात्र अंतिम निकालानुसार त्यांच्या पॅनेलने एकूण १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीचे समर्थन असलेल्या १२ उमेदवारांचा विजय झाला. या पराभवानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘दिलेला कौल मी मान्य करतो’, अशी प्रतिक्रिया देत पराभव स्वीकारला. या निवडणुकीत मुश्रीफ यांच्या मुलाचाही पराभव झाला असून, अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच स्वतः सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर पोहोचले होते.

विजयानंतर बोलताना सतेज पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली. कोल्हापूरची माती आणि इथला शेतकरी स्वाभिमानी तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्याचे ते म्हणाले. संध्याकाळी दुधाची वेळ असल्याने इथे कुणालाही सभेसाठी लोक मिळणार नाहीत. अशा या स्वाभिमानी जिल्ह्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न लोकांना अजिबात मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असल्याचे मतदारांनी दाखवून दिले असून, शपथांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. राज्यात दुष्काळ असताना मतदारांना सहलीवर घेऊन जाणे आणि देवाची भीती घालून शपथा घ्यायला लावणे अत्यंत चुकीचे होते, अशी टीका पाटील यांनी केली. आम्ही २५-३० वर्षे राजकारणात आहोत, मग आम्हालाच मतदान करण्याच्या शपथा का घेतल्या जात होत्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या प्रकारामुळे नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा गेल्याचे पाटील यांनी नमूद केले. लोक मतदान करताना सर्व गोष्टी बघून शिक्के मारतात, यातून लोकशाही किती मजबूत आहे हे दिसून आले. नवीन लोकांना संधी देणे आवश्यक होते. शेवटी शेणात काम करणारा शेतकरी आणि माता-भगिनी म्हणजेच दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा ‘बाप’ असल्याचे सतेज पाटील यांनी ठणकावून सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने एकूण १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीचे समर्थन असलेल्या १२ उमेदवारांचा विजय झाला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही