प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: सत्तेचा अहंकार निर्माण होतो आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना वाढीस लागते, तेव्हा गोकुळ दूध संघासारखा निकाल समोर येतो, असा सणसणीत टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी गोरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रचारसभेत जयकुमार गोरे यांनी शिंदे गटाचे सचिन सानप कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर पलटवार करताना सामंत यांनी गोरेंना महायुतीचा धर्म पाळण्याची आठवण करून दिली. जर गोरे यांना सानप कोण आहेत हे माहीत नसेल, तर येत्या २७ तारखेला ते आमदार म्हणून निवडून येतील, तेव्हा त्यांची ओळख पटेल, असा थेट इशारा सामंत यांनी दिला.
लोकशाहीत निवडणूक लढवणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारालाही हिणवणे योग्य नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. एखाद्या उमेदवाराला चार मते मिळणार नसली, तरी तो लोकशाहीतील एक उमेदवार असून त्याचा सन्मान राखायला हवा. आपल्याकडे सत्ता आहे आणि आपण बोलू तेच योग्य, असा अहंकार बाळगल्यास मतदार कसा धडा शिकवतात, याचे गोकुळचा निकाल हे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही भारत-पाकिस्तानची लढाई नसून ती एक मैत्रीपूर्ण लढत आहे. आपण सर्वजण सत्तेत एकत्र आहोत, त्यामुळे सबुरीने घेतल्यास महायुती सर्व ठिकाणी नक्की विजयी होईल. मात्र, या प्रक्रियेत कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी नेत्यांनी घ्यायला हवी, असा सल्लाही उदय सामंत यांनी दिला.
सोमवारी पार पडलेल्या गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. महायुतीच्या नेत्यांनी २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा केला होता, तर सतेज पाटील यांच्या पॅनेलला फार तर ४ जागा मिळतील अशी चर्चा होती. मात्र, पाटील यांच्या पॅनेलने १३-१२ अशा फरकाने महायुतीचा पराभव करत १३ उमेदवार निवडून आणले.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजू सॅमसनने ‘जेलर २’ पाहण्यासाठी बूक केले संपूर्ण थिएटर; रजनीकांत यांच्यावरील प्रेमापोटी उचलले पाऊल
- गोकुळ दूध संघ निवडणूक: जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पडला, सतेज पाटील केंद्रावर; रात्री उशिरा मोठा राडा
- मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे; शिवाजी पार्क आणि नेस्को सेंटरवर धडाडणार तोफा
Quick Answers
सत्तेचा अहंकार निर्माण होतो आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना वाढीस लागते, तेव्हा गोकुळ दूध संघासारखा निकाल समोर येतो, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जयकुमार गोरे यांना लगावला.
शिंदे गटाचे सचिन सानप कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही, असे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी एका प्रचारसभेत केले होते.
जर गोरे यांना सानप कोण आहेत हे माहीत नसेल, तर येत्या २७ तारखेला ते आमदार म्हणून निवडून येतील, तेव्हा त्यांची ओळख पटेल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३-१२ अशा फरकाने महायुतीचा पराभव करून आपले १३ उमेदवार निवडून आणले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






