मुंबई, 19 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी संध्याकाळी जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर राज्याबाहेर पळून गेलेल्या या आरोपींना जलद तपास करत सोमवारी सकाळी राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आले. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला आहे.
या तिन्ही आरोपींची नावे आता समोर आली आहेत. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. तर दुसरा २२ वर्षीय ऋतिक कुमार ऊर्फ रोशन हा मुंबईतील अंधेरी येथे राहणारा असून तो रॅपिडो बाईक चालवण्याचे काम करायचा. तिसरा १८ वर्षीय आरोपी रेहान हा हरियाणाच्या सोनिपत येथील रहिवासी आहे. या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्या चौकशीतून गुन्ह्याचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.
रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) गाडीच्या दिशेने सात राऊंड फायरिंग करण्यात आले होते. तीनपैकी दोन जणांनी गोळ्या झाडल्या, तर एक जण बाईकवर तयार होता. आजूबाजूचे लोक सावध होताच त्यांनी जुहूच्या पुष्पा पार्क येथून पळ काढला. रविवार असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे सुसाट वेगाने बाईक चालवत त्यांनी अवघ्या १२ मिनिटांत, म्हणजेच ७ वाजून १२ मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानक गाठले.
अंधेरीवरून लोकल ट्रेन पकडून हे तिघे वसईला पोहोचले. त्यानंतर रात्री १० वाजून १० मिनिटांनी वसई स्थानकात आलेली पुणे-जयपूर एक्सप्रेस त्यांनी पकडली. सोमवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ही ट्रेन राजस्थानच्या कोटा स्थानकात पोहोचताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
या हल्ल्यापूर्वी टायगर श्रॉफचे घर आणि तो खेळायला जात असलेल्या फुटबॉल मैदानाची रेकी करण्यात आली होती. टायगर नेमका कोणत्या गाडीतून फिरतो, याची माहिती शूटर्सना पुरवण्यासाठी रेकी करणारी वेगळी टीम असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता या रेकी करणाऱ्या टीमचाही कसून शोध घेत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या लॉबीत मिळाली पहिली ऑफर, पदार्पणाआधीच ३ सिनेमे मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री कोण?
- ‘कोणाचीही गय केली जाणार नाही’; राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुनेत्रा पवार आक्रमक
- ‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशेंना रुग्णालयात करावं लागलं होतं दाखल; केतकी थत्तेने सांगितला ‘तो’ प्रसंग
Quick Answers
या प्रकरणातील आरोपींना सोमवारी सकाळी राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींमध्ये एका अल्पवयीनासह, मुंबईतील अंधेरी येथे राहणारा आणि रॅपिडो बाईक चालवणारा २२ वर्षीय ऋतिक कुमार ऊर्फ रोशन, आणि हरियाणाच्या सोनिपत येथील रहिवासी १८ वर्षीय रेहान यांचा समावेश आहे.
या हल्ल्यापूर्वी टायगर श्रॉफचे घर आणि तो खेळायला जात असलेल्या फुटबॉल मैदानाची रेकी करण्यात आली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







