सिंधुदुर्ग, 19 ऑक्टोबर: नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकणासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसह राज्यातील (Maharashtra Rain) अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा सतर्कतेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
रविवारी कोकणासह कोल्हापुरात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, तसेच रत्नागिरी शहर आणि चिपळूण परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर संगमेश्वर तालुक्यातील देवरुखसह काही भागांत पावसाने चांगलाच जोर धरला. पावसामुळे चिपळूण शहर परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. या अचानक आलेल्या पावसामुळे भातकापणी पूर्ण झालेल्या आणि पीक काढणीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सांगली, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी (१८ ऑक्टोबर) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे. यासोबतच उत्तर कर्नाटकमध्ये ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. लक्षद्वीप बेटांपासून कर्नाटक मार्गे आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील हवामानात पावसाला अनुकूल असे बदल होत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या लॉबीत मिळाली पहिली ऑफर, पदार्पणाआधीच ३ सिनेमे मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री कोण?
- ‘कोणाचीही गय केली जाणार नाही’; राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुनेत्रा पवार आक्रमक
- ‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशेंना रुग्णालयात करावं लागलं होतं दाखल; केतकी थत्तेने सांगितला ‘तो’ प्रसंग
Quick Answers
नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. तसेच उत्तर कर्नाटकातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि लक्षद्वीप बेटांपासून कर्नाटक मार्गे आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामानात पावसाला अनुकूल बदल होत आहेत.
हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय सांगली, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, तसेच रत्नागिरी शहर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे चिपळूण परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला आणि भातकापणी पूर्ण झालेल्या किंवा काढणीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








