‘अकबन’ चक्रीवादळाचा धोका: महाराष्ट्रात हवामान बदलणार, विदर्भ-मराठवाड्यात ४ दिवस पावसाचा अंदाज

बंगालच्या समुद्रातील ‘अकबन’ चक्रीवादळ २० नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

Published On: 

Akban cyclone threat weather change and rain forecast in Maharashtra

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: पश्चिम बंगालच्या समुद्रात वाढलेल्या तापमानामुळे ‘अकबन’ नावाचे शक्तिशाली चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ २० नोव्हेंबरच्या रात्री १२० किलोमीटर प्रति तास वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला तरी, राज्याच्या हवामानात यामुळे मोठे बदल होणार आहेत.

गेल्या सात ते आठ दिवसांपासून हे चक्रीवादळ समुद्रात आकार घेत आहे. ते अधिक काळ सक्रिय राहिल्यास त्याला ऊर्जा मिळून ते अधिक तीव्र होण्याचा धोका आहे. हे वादळ यापूर्वीच्या ‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ चक्रीवादळांपेक्षा अधिक धोकादायक असू शकते. या वातावरणीय बदलांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटे गारठा वाढला आहे. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडली असून, कोकणातही तापमान घसरले आहे. असे असले तरी, दिवसा उष्णता जास्त वाढत आहे. चक्रीवादळामुळे आगामी काळात थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्यात ऊन, थंडी आणि पाऊस अशी संमिश्र स्थिती पाहायला मिळेल.

एका महिन्यात आलेले हे तिसरे चक्रीवादळ असले तरी, राज्याचा पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे नोव्हेंबरपासून दुष्काळाचे भीषण संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, फेब्रुवारीपर्यंत जाणवणारा ‘एल निनो’चा प्रभाव आता मार्च-एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. परिणामी यंदा भीषण उकाडा जाणवू शकतो. याशिवाय मान्सूनच्या वाऱ्यांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही