प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या तपासातून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपींनी या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी करत १० दिवसांपूर्वीच कट रचला होता. टायगर दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानावर खेळण्यासाठी जातो, ही माहिती त्यांनी त्याच्या दिनक्रमावर पाळत ठेवून मिळवली होती. त्यामुळे हल्ल्याच्या दिवशी हे आरोपी तब्बल ४५ मिनिटे आधीच मैदानाबाहेर पोहोचले होते आणि टायगरच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते.
या घटनेचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता टायगर नेहमीप्रमाणे जुहू येथील मैदानावर पोहोचला. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता तीन आरोपी मैदानाबाहेर आल्याची माहिती आहे. सायंकाळी ७ वाजता खेळ संपवून टायगरने चाहत्यांसोबत सेल्फी काढला आणि तो आपल्या कारमध्ये जाऊन बसला. त्यानंतर बरोबर ७.०५ वाजता कार प्रवेशद्वाराजवळ येताच दोन हल्लेखोरांनी कारवर सात गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका हल्लेखोराने टायगरला, तर दुसऱ्याने चालकाला लक्ष्य केल्याचा प्राथमिक दावा आहे. गोळीबारानंतर ते तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाले.
या गोळीबारात टायगरचा एक चाहता जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ७.३० वाजता टायगरने चालकाला ड्रायव्हिंग सीटवरून बाजूला केले आणि स्वतः कार चालवत नानावटी रुग्णालय गाठल्याचे सांगितले जाते. रात्री १० वाजता लॉरेन्स गँगशी संबंधित असलेल्या अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला. यानंतर रात्री ११.३० वाजता टायगरच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली व ११.४० वाजता मुंबई पोलिसांनी त्याला सुखरूप घरी नेऊन पोहोचवले.
हल्ल्यानंतर आरोपींनी देशाबाहेर पळून जाण्याचा मोठा प्लॅन आखला होता. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेने जयपूर गाठून, तिथून बसने दिल्ली आणि पुढे रस्तेमार्गे नेपाळ सीमेवरून देशाबाहेर पळ काढण्याची त्यांची योजना होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी कारवाई करत त्यांना कोटा येथे पकडल्याची माहिती समोर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या लॉबीत मिळाली पहिली ऑफर, पदार्पणाआधीच ३ सिनेमे मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री कोण?
- ‘कोणाचीही गय केली जाणार नाही’; राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुनेत्रा पवार आक्रमक
- ‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशेंना रुग्णालयात करावं लागलं होतं दाखल; केतकी थत्तेने सांगितला ‘तो’ प्रसंग
Quick Answers
पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपींनी या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी करत १० दिवसांपूर्वीच कट रचला होता.
कार प्रवेशद्वाराजवळ येताच दोन हल्लेखोरांनी कारवर सात गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉरेन्स गँगशी संबंधित असलेल्या अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेने जयपूर गाठून, तिथून बसने दिल्ली आणि पुढे रस्तेमार्गे नेपाळ सीमेवरून देशाबाहेर पळ काढण्याची त्यांची योजना होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







