अभिनेता इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस; कारवाईवरून नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर राजकारण तापले असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Nana Patole criticize RSS over violence in Nagpur

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत झालेल्या एका आंदोलनात इम्रानने सहभाग नोंदवला होता. या कारवाईवरून आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या इम्रान खानला परदेशी नोंदणी कार्यालयाने ही नोटीस जारी केली आहे. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्टच्या कलम ७ आणि २९ अंतर्गत त्याला २८ ऑक्टोबरपूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा इम्रान खानच्या करिअरवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

या कारवाईवर माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “फक्त इम्रान खानच नाही, तर जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल, तो देशद्रोही राहील, अशी सरकारमध्ये बसलेल्या लोकांची भूमिका झाली आहे.” देशातील ३२ कोटी लोकांची नावे एसआयआरच्या माध्यमातून जाती-धर्मांच्या आधारे हेतुपुरस्सर मतदार यादीतून काढली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकांचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याचे ते म्हणाले.

“जे संविधान मानत नाहीत, असे लोक सरकारमध्ये बसले आहेत, मग अशा लोकांना तुम्ही देशद्रोही म्हणायचं का?” असा सवाल उपस्थित करत पटोले पुढे म्हणाले, “आता सरकारविरोधात बोलायचे असेल किंवा आंदोलन करायचे असेल, तर पैसे भरावे लागतात. ही कुठली लोकशाही आहे? स्वतंत्र भारतात प्रत्येक नागरिकाला मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर देशात हुकूमशाही चालवण्याचे काम सुरू आहे.” ३२ कोटी लोकांची नावे वगळून सरकारनेच एक प्रकारे देशद्रोह केल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत झालेल्या एका आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही