मुंबई, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या हद्दपारीच्या नोटिशीविरोधात त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एक आंदोलन झाले होते. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे पोलिसांनी इम्रान खानला ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गावदेवी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असल्याचा दावा करत, त्याने राजकीय आंदोलनात भाग घेतल्यावर सोमय्या यांनी आक्षेप नोंदवला होता.
इम्रान खान हा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक असल्याचे सांगण्यात येत आहे. OCI कार्डधारकांना राजकीय आंदोलनात सहभागी होण्यावर असलेल्या निर्बंधांचा आधार घेत FRRO ने कारवाई केली आहे. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ अंतर्गत इम्रानला ही नोटीस बजावण्यात आली असून, त्यानुसार त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
FRRO च्या या कारवाईला आव्हान देण्यासाठी इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. न्यायालयात MZM लीगलच्या वतीने ॲड. झुल्फिकार मेमन, ॲड. परवेझ मेमन आणि ॲड. चिराग नाईक हे त्याची बाजू मांडणार आहेत. सरन्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या चित्रपटांपासून दूर असलेला इम्रान खान मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता मुंबई उच्च न्यायालय या नोटिशीबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना शिंदेंनी कोणतं काम दिलं हे उघड; संजय राऊतांचा थेट आरोप
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची तातडीची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- IND vs WI 4th T20: वैभवचा आत्मविश्वास खच्ची केला! टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर माजी दिग्गज संतापले
Quick Answers
FRRO ने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ अंतर्गत इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणारी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केली. इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असल्याचा दावा करत, त्याने राजकीय आंदोलनात भाग घेतल्यावर सोमय्या यांनी आक्षेप नोंदवला होता.
इम्रान खान हा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक असल्याचे सांगण्यात येत असून, OCI कार्डधारकांना राजकीय आंदोलनात सहभागी होण्यावर असलेल्या निर्बंधांचा आधार घेत FRRO ने ही कारवाई केली आहे.
या नोटिशीला आव्हान देण्यासाठी इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. न्यायालयात MZM लीगलच्या वतीने ॲड. झुल्फिकार मेमन, ॲड. परवेझ मेमन आणि ॲड. चिराग नाईक हे त्याची बाजू मांडणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








