तुकाराम मुंढेंचा धाक आहे का? MPSC कडून कागदपत्रे नष्ट करण्याच्या घाईवरून रोहित पवारांचा थेट इशारा

तुकाराम मुंढेंच्या चौकशी समितीच्या धाकामुळे MPSC जुनी कागदपत्रे रद्दीत नष्ट करत आहे का, असा सवाल करत रोहित पवारांनी आयोगाला इशारा दिला आहे.

Published On: 

Rohit Pawar press conference on Farmer Loan Waiver delay in Maharashtra.

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) कथित गैरप्रकारांवरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. न्यायिक चौकशी आयोगाचा आणि तुकाराम मुंढे यांच्या धाकामुळे जुनी कागदपत्रे रद्दीत काढून नष्ट करण्याची घाई का सुरू आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांसोबत सलग अकरा दिवस केलेल्या आंदोलनाला मोठे यश आल्यानंतर ते सध्या स्थगित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलन थांबले म्हणजे सर्व शांत झाले आणि आमचे लक्ष नाही, असा गैरसमज आयोगातील महाभागांनी करून घेऊ नये, असा स्पष्ट इशारा पवार यांनी दिला. जोपर्यंत न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कागदपत्रे नष्ट करण्याच्या निर्णयाला आयोगाचे सचिव किंवा सरकारने तात्काळ स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सोशल मीडियावर पोस्ट करत पवार यांनी आयोगाला खडेबोल सुनावले. पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, सत्य बाहेर आणण्यासाठी आणि आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण करण्यासाठी सर्व जुन्या कागदपत्रांची तपासणी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. दुसरीकडे, एमपीएससीचे आयुक्त भीमनवार हे रजेवर गेले आहेत. सुरुवातीला त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण रजेवर जात असल्याचे स्पष्टीकरण भीमनवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

जोपर्यंत न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कागदपत्रे नष्ट करण्याच्या निर्णयाला आयोगाचे सचिव किंवा सरकारने तात्काळ स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही