नाना पाटेकर जिवंत आहेत, सिंगापूरमध्ये असू शकतात; निधनानंतर तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने गंभीर आरोप केले आहेत. नाना जिवंत असून अंत्यसंस्कार अंधारात का केले, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

Published On: 

Tanushree Dutta and Nana Patekar controversy

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असतानाच, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने या मृत्यूवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने सोशल मीडियावरून नाना पाटेकर अद्याप जिवंत असल्याचा धक्कादायक दावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तनुश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लाईव्ह व्हिडीओ करत खळबळ उडवून दिली आहे. एवढ्या महान कलाकाराला अखेरचा निरोप देण्याची संधी लोकांना का मिळाली नाही, असा सवाल तिने केला. तसेच सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी आणि मीडियाने नानांचे पार्थिव पाहिलेलेच नाही, असा दावाही तिने या व्हिडीओतून केला आहे.

अंत्यसंस्काराच्या वेळेवर संशय व्यक्त करत तनुश्रीने म्हटले आहे की, रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी इतक्या घाईघाईत अंत्यविधी का उरकण्यात आले? काही भोळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंधारात हे अंत्यसंस्कार पार पडल्याचे सांगत, नानांचा चेहरा का दाखवला नाही, असा प्रश्न तिने विचारला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी तिने थेट डीएनए (DNA) चाचणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी खोटा मृत्यूचा दाखला तयार करण्यात आला असावा, असा आरोपही तिने लावला आहे. नाना पाटेकर अद्याप जिवंत असू शकतात आणि ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये असण्याची शक्यता तिने वर्तवली आहे. तनुश्रीच्या या दाव्यांमुळे सोशल मीडिया आणि नानांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर अद्याप जिवंत असल्याचा दावा केला असून ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये असण्याची शक्यता वर्तवली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही