मतं मिळवण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचवला ‘प्रसाद’; बच्चू कडूंच्या व्हायरल व्हिडिओने अमरावतीत खळबळ

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतांसाठी ‘प्रसाद’ पोहोचवल्याचे वक्तव्य करणारा आमदार बच्चू कडू यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published On: 

MHD LOGO

अमरावती, 15 ऑक्टोबर: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या एका बंद दाराआड झालेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर आला आहे. अमरावतीतील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत, आमदार बच्चू कडू यांनी मतदारांपर्यंत 'प्रसाद' पोहोचल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या महत्त्वाच्या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार बच्चू कडू उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर मार्गदर्शन करताना, कडू यांनी मुस्लिम गटांची मते आपल्याकडे कशी वळवता येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच, निवडणुकीसाठी तालुकानिहाय यंत्रणा कामाला लागली असून प्रत्येकापर्यंत 'प्रसाद' पोहोचवण्यात आला आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केले.

आपले भाषण सुरू असताना कुणीतरी मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे कडू यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला रेकॉर्डिंग करण्यापासून रोखले आणि त्याला सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतांच्या राजकारणावरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

यंदा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. भाजपने ही जागा शिंदे गटासाठी सोडली असून, विद्यमान आमदार किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याशिवाय संगीता शिंदे, शेखर भोयर आणि डॉ. सुमित पवार यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने महायुतीसमोरील डोकेदुखी वाढली आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्येही उमेदवारीवरून मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे यांना तिकीट दिले आहे. यासोबतच विज्युक्टा संघटनेचे डॉ. अविनाश बोर्डे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांच्या या भाऊगर्दीमुळे मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला बसणार, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही