प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे राज्यातील १० जिल्ह्यांमधील ६३५ गावे आणि २ हजार ४४७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यामध्ये मराठवाड्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून, तिथे सर्वाधिक टँकर्स सुरू आहेत.
राज्य शासनाने आणखी काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला असून, आता राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली आहे. 'सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मदतीसाठी कुठेही कमी पडणार नाही,' अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली आहे.
पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सद्यस्थितीत राज्यात १५ शासकीय आणि ७६८ खाजगी टँकर्सच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ३७४ टँकर्स सुरू आहेत. यात संभाजीनगर जिल्ह्यात १६९, बीडमध्ये १६६, जालन्यात २९ तर धाराशिवमध्ये १० टँकर्सचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रात एकूण २१८ टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १२३, सांगलीत ४९, साताऱ्यात ३८ आणि पुणे जिल्ह्यात ८ टँकर्स सुरू आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात १७६ टँकर्सद्वारे नागरिकांची तहान भागवली जात असून, अहिल्यानगरमध्ये १६१ आणि नाशिकमध्ये १५ टँकर्स पाणीपुरवठा करत आहेत.
सध्याची गंभीर परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचे संकट ओळखून काही मोठ्या शहरांमध्ये पाणीकपातीचा निर्णयही लागू करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुणरत्न सदावर्ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत; थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची केली मागणी
- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क घेऊ नका, घेतलेले परत करा : चंद्रकांत पाटील
- आयपीएल लिलावापूर्वीच खेळाडूंची मोठी अदलाबदल; टी. नटराजनची हैदराबादमध्ये घरवापसी, तर अन्सारी दिल्लीत
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








