आंबेगाव, 12 ऑक्टोबर: आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभात बोलताना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शेतकरी संघटनांवर जोरदार टीका केली. उसाला पहिली उचल पाच हजार रुपये देण्याच्या मागणीवरून त्यांनी खडेबोल सुनावले. “तुमच्या काकाने ऊसाला ५ हजारांचा दर ठेवलाय का?” असा थेट सवाल करत त्यांनी (Dilip Walse) आपला संताप व्यक्त केला.
साखर कारखानदारी सध्या मोठ्या अडचणीत सापडली असताना काही लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करत असल्याचा आरोप वळसे पाटील यांनी केला. अशा अवास्तव मागण्या करणाऱ्यांनी स्वतः एखादा कारखाना चालवायला घ्यावा आणि मग पाच हजार रुपये उचल मागावी, असा टोला त्यांनी लगावला. कारखान्यांनी उचल कुठून द्यायची, कर्ज काढून द्यायची की कारखाना बंद पाडायचा? असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि देशातील साखरेचा तुटवडा पाहता सरकारला साखरेची गरज आहे. त्यामुळे यंदा उसाच्या रसापासून किंवा मोलेसेसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परिणामी, साखर कारखान्यांवर यंदा केवळ मळीपासूनच इथेनॉल निर्मिती करण्याची वेळ येणार असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या भीषण दुष्काळामुळे साखर कारखान्यांसमोर उसाच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहणार आहे. उसाची लागवडच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने, पुढच्या वर्षी राज्यात साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबाबतही त्यांनी गंभीर भीती व्यक्त केली.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान वळसे पाटील यांनी स्वतःचे उदाहरण देत एक मिश्किल टिप्पणी केली. “मी बांधावरचा पाटील शेतकरी, खरे शेतकरी पुतणे मागे,” असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
📌 महत्वाच्या बातम्या
- 8th Pay Commission: वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी; फिटमेंट फॅक्टर वाढीचा प्रस्ताव
- आयफोन भेट, लग्नासाठी ब्लॅकमेलिंग अन् बदनामीची धमकी; मानसिक त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये तरुणीची आत्महत्या
- माझ्याजवळ मोदींची कुंडली, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय देशातील युवक थांबणार नाही; गांधींचे आरपारच्या लढाईचे रणशिंग
Quick Answers
उसाला पहिली उचल पाच हजार रुपये देण्याच्या शेतकरी संघटनांच्या मागणीवरून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार टीका केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि देशातील साखरेचा तुटवडा यामुळे सरकार यंदा उसाच्या रसापासून किंवा मोलेसेसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देणार नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
भीषण दुष्काळामुळे उसाच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहून लागवडच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने, पुढच्या वर्षी राज्यात साखर कारखाने सुरू होतील की नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









