Share

बीडमध्ये भररस्त्यात तरुणाला दांडक्याने मारहाण; भांडण सोडवायला गेलेल्या महिलांनाही दिला धाक

बीडमध्ये तीन तरुणांनी एकाला दांडक्याने मारहाण केली. मध्यस्थीसाठी आलेल्या महिलांनाही धाक दाखवण्यात आला असून पोलीस येताच आरोपींनी पळ काढला.

Published On: 

Beed Crime youth beaten with stick on street women threatened

बीड, 12 ऑक्टोबर: बीड शहरातील बालेपीर भागात भररस्त्यात एका तरुणाला तीन जणांनी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाची सोडवणूक करण्यासाठी पुढे आलेल्या महिलांनाही हल्लेखोरांनी दांडक्याचा धाक दाखवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालेपीर परिसरातील मुस्कान फंक्शन हॉलसमोर रात्रीच्या वेळी काही तरुणांमध्ये वाद उफाळून आला होता. या वादातून तीन तरुणांनी मिळून एकाला पकडले आणि त्याला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून काही महिलांनी मध्यस्थी करत तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपींनी या महिलांनाही मारहाणीचा इशारा देत धाक दाखवला.

दरम्यान, या हाणामारीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस आल्याचे पाहताच मारहाण करणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकाराप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Beed Crime) करण्याची प्रक्रिया सुरू होती.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही