‘काय समजतेस काय स्वतःला?’, नाना पाटेकरांनी सोनाली कुलकर्णीला का झापले होते? अभिनेत्रीनेच सांगितला किस्सा

एका चित्रपटाला नकार दिल्यानंतर नाना पाटेकर सोनाली कुलकर्णीवर प्रचंड संतापले होते. सोनालीने स्वतः एका लेखात या प्रसंगाचा सविस्तर खुलासा केला आहे.

Published On: 

Sonali Kulkarni reveals unknown facts about Nana Patekar

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी २०११ मधील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि २०१४ च्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तत्पूर्वी २००६ मध्ये ते ‘टॅक्सी नंबर ९२११’ या हिंदी चित्रपटातही झळकले होते. सोनालीने नुकतेच ‘लोकसत्ता’साठी लिहिलेल्या एका लेखात नानांसोबतच्या पहिल्या भेटीपासून ते सेटवरील भांडणांपर्यंतचे अनेक रंजक किस्से शेअर केले आहेत.

एका चित्रपटाची ऑफर नाकारतानाचा प्रसंग सांगताना सोनाली म्हणाली की, निर्मात्याचे वर्तन न आवडल्याने तिने तो सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ती एका भाड्याच्या घरात राहत होती. नानांनी (Nana Patekar) तिचा संपर्क क्रमांक मिळवला आणि तिला रिहर्सलसाठी घरी बोलावले. जेव्हा सोनालीने आपण तो चित्रपट करत नसल्याचे स्पष्ट केले, तेव्हा नानांचा पारा चढला.

प्रचंड चिडलेल्या नानांनी तिला थेट विचारले, “काय समजतेस काय स्वतःला? माझ्या समोर सिनेमे निवडण्याइतकी मोठी झालीस का तू?”. मात्र, तरीही न घाबरता सोनालीने आपण या निर्णयावर ठाम असल्याचे सांगून चित्रपट नाकारण्याचे कारण त्यांना समजावून सांगितले.

त्यांच्यात असा प्रसंग केवळ एकदाच घडला असे नाही. ‘टॅक्सी नंबर ९२११’ च्या शूटिंगवेळीही त्यांच्यात खटके उडाले होते. सेटवर आल्यावर नाना त्यांच्या भूमिकेत इतके घुसायचे की, सहकलाकारांनी संवाद कसे बोलायचे याच्या सूचना तेच द्यायला लागायचे. एका दृश्याच्या वेळी नाना दिग्दर्शकाला डावलून सोनालीला सतत सूचना देऊ लागल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

नानांना गप्प करत सोनाली म्हणाली, “अहो, तसं करत बसले तर मी लेडी नाना पाटेकर वाटेन ना! आणि मला नाही तसं न्यायचं.” अशाच एका आजीच्या दृश्यातही नाना तिला एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्यात हसू आणण्याचा आग्रह करत होते. सेटवर सर्वच जण सूचना देऊ लागल्याने तिने चिडून सर्वांना दहा मिनिटे बाहेर जायला सांगितले आणि त्यानंतर शांतपणे चित्रीकरण पूर्ण केले.

नानांची पहिली भेट ‘एनसीपीई’मध्ये डॉक्टर जब्बर पटेल यांच्या कुसुमाग्रजांवरील डॉक्युमेंटरीच्या चित्रीकरणावेळी झाल्याचे सोनालीने सांगितले. त्यावेळी ती आणि ना. घो. महानोर ‘पळस’ कविता म्हणणार होते, तर नाना पूजा पवारसोबत ‘ऑथेलो’चे शूटिंग करत होते. नानांसारख्या महान अभिनेत्यासमोर काम करताना सोनालीने नेहमीच आपली ठाम आणि निर्भीड भूमिका मांडली. तिच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे ‘टॅक्सी नंबर ९२११’ नंतर त्यांच्यात कधीही न संपणारे सौहार्दाचे नाते फुलल्याचे तिने या लेखात नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही