अभिजित दिपकेंचा सुटकेनंतर इशारा: ‘आंदोलन न करण्याच्या कोणत्याही बाँडवर स्वाक्षरी नाही, पुन्हा रस्त्यावर उतरणार’

दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले असून कोणत्याही अटींवर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले आहे.

Published On: 

Abhijit Dipke

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही यापुढे आंदोलन करणार नाही, अशा कोणत्याही जामीनपत्रावर (बाँड) स्वाक्षरी केलेली नसून आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा दिपके यांनी दिला आहे. दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

सीजेपीने समाजमाध्यमांवरून दिपके (Abhijeet Dipke) यांच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. सीजेपीने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही नेत्याने आंदोलन न करण्याच्या जामीनपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. या बाँडमध्ये केवळ शांतता भंग न करण्याची अट नमूद आहे. शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणे हा घटनात्मक अधिकार असून त्यामुळे शांततेचा भंग होत नाही, असे पक्षाने म्हटले आहे.

सौरव दास, अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर, त्यांनी शांतता भंगाचा बाँड लिहून दिल्याने ते भविष्यात निदर्शनांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत असे तर्कवितर्क लावले जात होते. यावर सीजेपीच्या लीगल टीम प्रमुख रत्ना सिंह यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर अशा प्रकारच्या बाँडवर सही करणे ही एक सामान्य कायदेशीर प्रक्रिया असून, कोणतीही विशिष्ट अट लादण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सीजेपी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. सौरभ दास यांनी मूलभूत हक्कांच्या उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, देशातील न्यायालयांनी यावर स्वतःहून कारवाई का केली नाही, असा सवाल केला. तर आशुतोष यांनी ज्ञानेश कुमार यांच्या प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ‘ज्ञानेश कुमारला वाचवणे म्हणजे राजाचा जीव धोक्यात आहे’, अशी टीका आशुतोष यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही