प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या ८५ वर्षीय आजी सावित्रीबाई दीपके यांचे शनिवारी निधन झाले. मात्र, नेमक्या याच दिवशी दिल्ली पोलिसांनी अभिजीत यांना थेट विमानातून अटक केली. अटकेनंतर त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या गावी आजींवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, मात्र या कठीण प्रसंगी अभिजीत यांना शेवटच्या दर्शनासाठी उपस्थित राहता येणार नसल्याने त्यांच्या कुटुंबाने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेवरून अभिजीत (Abhijeet Dipke) यांच्या आईने सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ‘सरकारला १३ कोटी मतदान चोरायला जमले, पण माझ्या मुलाला त्याच्या आजीच्या अंत्यविधीला सोडायला जमले नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या अभिजीतचे काम सर्वांच्या भल्यासाठी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. मात्र, अशा वैयक्तिक दुःखाच्या क्षणी त्याला कुटुंबासोबत राहता न आल्याने त्यांनी मोठी अस्वस्थता व्यक्त केली.
आजीचे निधन झालेले असतानाही एका विद्यार्थ्याला विमानातून अटक करून डांबून ठेवणे देशाला काळिमा फासणारे असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. कुटुंबाच्या दुःखात त्याला सहभागी न होऊ देणे हा प्रकार अत्यंत अमानुष आणि अन्यायकारक असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
अभिजीत यांच्या वडिलांनी या पोलीस कारवाईच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कथित भ्रष्टाचार उघड केल्यामुळेच मुलाला अटक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘माझ्या मुलाला विमानातून कोणत्या कायद्याखाली अटक केली? देशाची फसवणूक करून पळून जाणाऱ्यांना आणि दहशतवाद्यांना विमानातून किती वेळा अटक झाली आहे? त्यांना शोधण्यात अपयशी ठरणारी यंत्रणा एका विद्यार्थ्याला अटक करते. माझ्या मुलाने असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे की त्याला अशी वागणूक मिळावी?’ असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचे आरोप; प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याचा सुनील पाल यांचा संताप
- सर्वोच्च न्यायालयाची सरकारला चपराक; ‘माझा न्यायालयावरून विश्वास उडालाय’, कपिल सिब्बल यांचे मोठे विधान
- पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी… सेहवागला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीमध्ये स्वतःची झलक का दिसते?
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









