Share

सचिन वाझेच्या जामिनाला विरोध का? मुंबई उच्च न्यायालयाने एनआयएला विचारला जाब

अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या जामिनाला एनआयएने केलेल्या विरोधावर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Published On: 

Sachin Vaze luxury cars Bombay high court hearing

मुंबई, 11 ऑक्टोबर: अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला विशेष एनआयए न्यायालयाने अत्यंत कठोर अटींवर जामीन मंजूर केला आहे. असे असतानाही राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या जामिनाला का विरोध करत आहे, अशी थेट विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी वाझेला जामीन दिला होता. या निर्णयाला आव्हान देत एनआयएने वाझेचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या अपीलावर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एनआयएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब ठेवली.

सुनावणीदरम्यान एनआयएची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. सचिन वाझेने (Sachin Waze) अत्यंत थंड डोक्याने हे कृत्य केले असून, संपूर्ण प्रकार दडपण्यासाठी साथीदार मनसूख हिरेन याची हत्या घडवून आणली, असा दावा त्यांनी केला. तसेच, या कटात सहभागी होण्यासाठी माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना पोलीस मुख्यालयातच रोख रक्कम दिल्याचा आरोपही सिंग यांनी केला.

दरमहा ९० हजार रुपये पगार असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे पाच आलिशान गाड्या आणि पंचतारांकित हॉटेलमधील १०० दिवसांचे वास्तव्य कसे काय असू शकते, असा सवालही एनआयएकडून उपस्थित करण्यात आला. मात्र, दोन दिवसांच्या या प्रदीर्घ युक्तिवादानंतरही खंडपीठाने एनआयएने घेतलेल्या जामीन विरोधाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही