‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ म्हणत मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याची फसवणूक; मॅट्रिमोनिअल साईटवरून १७ लाखांचा गंडा

लग्नाचे आमिष दाखवून मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ९७ हजारांची फसवणूक. मुंबई सायबर पोलिसांत दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल.

Published On: 

Cyber crime conceptual image showing a defrauded female officer and matrimonial fraud

मुंबई, 11 ऑक्टोबर: ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ असे सांगत मंत्रालयात उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी जोडीदार शोधताना मॅट्रिमोनिअल साईटचा वापर करणे या उच्चशिक्षित महिलेला चांगलेच महागात पडले असून, तिची तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील एका विभागात अधिकारी असलेल्या या पीडित महिलेचे नाव सागरिका (बदललेले नाव) आहे. त्यांनी लग्नासाठी एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले प्रोफाईल बनवले होते. तेथून सुनील नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण यूकेचे नागरिक असून लग्नास इच्छुक असल्याचे त्याने सांगितले. काही काळ ऑनलाईन चॅट करून त्याने सागरिका यांचा विश्वास संपादन केला. यानंतर कस्टम क्लिअरन्स, भेटवस्तू आणि अन्य वैयक्तिक कारणे सांगून त्याने महिलेकडून ऑनलाईन पैसे घेण्यास सुरुवात केली.

याच काळात, विशाल नावाच्या दुसऱ्या एका भामट्याने सीमा यांच्याशी संपर्क साधला. स्वतःला कॅनडाचा रहिवासी सांगून त्यानेही लग्नासाठी तयारी दर्शवली. आपत्कालीन परिस्थिती आणि कौटुंबिक अडचणींचे खोटे कारण पुढे करत त्यानेही सीमा यांच्याकडून मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली.

या दोन्ही आरोपींनी केलेल्या भूलथापांना बळी पडून सागरिका यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण १७ लाख ९७ हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, आरोपींकडून पैशांची मागणी सातत्याने होऊ लागल्याने आणि लग्नाविषयी टाळाटाळ केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईतील दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाणे गाठून दोन्ही भामट्यांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फोन नंबर आणि बँक खात्यांच्या माहितीवरून आरोपींचा वेगाने तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही