दिल्ली, 10 ऑक्टोबर: दिल्लीत पोलिसांची धरपकड सुरू असतानाच सीजेपीने आणखी मोठ्या आंदोलनाची (CJP Protest) घोषणा केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा सीजेपीकडून देण्यात आला असून यासाठी चार दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कारवाईनंतर दिपके यांनी संघटनेची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवली. यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पोलिसांकडून दिपके यांचा भावनिक छळ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
मोदी सरकार आंदोलनाला घाबरले असून सीजेपीच्या तीन प्रमुख नेत्यांना थेट विमानातून ताब्यात घेण्यात आल्याचे अजिंक्य शिंदे यांनी सांगितले. नेहा बोरा यांच्यासारख्या नेत्यांवरही कारवाई झाली आहे. मागील वेळी जंतरमंतरवर एकत्र येत सरकारला धक्का दिला होता, त्यामुळे यंदा दिल्लीकडे येणाऱ्या आंदोलकांना वाटेतच ट्रेन आणि बसमधून ताब्यात घेण्यात आले. हवा आणि पाणी सोडून सर्व काही रोखले असले तरी, आम्ही हुकूमशाहीला घाबरणार नाही. सरकारची ही भीतीच आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय असल्याचे ते म्हणाले.
अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाले असतानाही पोलिसांनी त्यांना वकील किंवा कुटुंबीयांशी बोलू दिले नाही. विमानातून ताब्यात घेण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, प्रवाशांनी प्रवास करणे सोडून द्यायचे का, असा सवाल त्यांनी विचारला. ताब्यात घेतलेल्या तिन्ही नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत सीजेपीने चिंता व्यक्त केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळेल या भीतीनेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याने बदनामी होत असून हा लढा चार ते पाच दिवस असाच सुरू राहील, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्ली-मुंबईत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; दीपके अटकेत, पण ‘प्लॅन बी’ने पोलिसांना दिला धप्पा
- CJP चे दिल्लीतील आंदोलन चिघळले; दगडफेकीत दोन पोलीस जखमी, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसह १००० जण ताब्यात
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









