छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर: छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पुकारलेल्या बंडाचा संदर्भ देताना, त्यावेळी आपण ‘झकमारी’ केली म्हणूनच आज मंत्री झालो, असे ते म्हणाले. मंत्रीपद मिळवण्याच्या प्रक्रियेत त्यावेळी मोठी स्पर्धा होती, असे नमूद करत आपण आज जे काही आहोत ते केवळ शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईमुळे असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील आणि मतदारसंघातील आव्हानांबाबत बोलताना शिरसाट यांनी आपले अनेक अनुभव मांडले. आपण चौथ्यांदा निवडून आलो असलो तरी, दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीच्या वेळी आपण जिंकू असे वाटले नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली. त्यांचा मतदारसंघ केवळ २० किलोमीटर अंतराचा असून त्यात ४ लाख मतदार आहेत, तरीही मतदारसंघातील ३० टक्के भागांत पोहोचणे शक्य होत नाही. कार्यकर्त्यांची समजूत काढण्यातच अर्धा वेळ खर्ची पडतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या कामाला सुरुवात करावी लागते, असे त्यांनी सांगितले. तसेच, जर आपण या व्यासपीठावर उपस्थित नसतो, तर प्रसारमाध्यमांनी ‘संजय शिरसाट नाराज’ असल्याच्या बातम्या चालवल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला.
प्रचारसभेतील आपल्या स्थानाबाबत खंत व्यक्त करताना शिरसाट म्हणाले की, आपली स्वतःची कोणतीही शाळा किंवा कॉलेज नसल्यामुळे अशा सभांमध्ये आपल्याला सर्वात शेवटी बोलायला उभे केले जाते. यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरही भाष्य केले. उमेदवारीची घोषणा काल झाली असली तरी, चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच फॉर्म आणला होता, असे त्यांनी सांगितले. निवडणूक जिंकायची असेल तर कार्यकर्त्यांना खूश ठेवा आणि उगाच आव आणू नका, असा सल्लाही शिरसाट यांनी चव्हाण यांना दिला. याशिवाय विक्रम काळे यांनी एक विक्रम प्रस्थापित केला असून, त्यांच्या पाठीशी त्यांच्या वडिलांची मोठी पुण्याई असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही शिरसाट यांनी आपले गणित मांडले. दुष्काळ आणि दसऱ्याच्या काळात केवळ १८ दिवसांत ७६ तालुक्यांचा दौरा करणे अत्यंत कठीण काम आहे, त्यामुळे आपण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधीही लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पांढऱ्या केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक हेअर डाय; जाणून घ्या साहित्य आणि कृती
- पीएम किसान योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार २४ वा हप्ता, अटी पूर्ण करण्याचे आवाहन
- महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; मात्र दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
Quick Answers
२०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पुकारलेल्या बंडाचा संदर्भ देत, त्यावेळी आपण ‘झकमारी’ केली म्हणूनच आज मंत्री झालो, असे विधान संजय शिरसाट यांनी केले. तसेच आपण आज जे काही आहोत ते शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईमुळे असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणूक जिंकायची असेल तर कार्यकर्त्यांना खूश ठेवा आणि उगाच आव आणू नका, असा सल्ला संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना दिला.
दुष्काळ आणि दसऱ्याच्या काळात केवळ १८ दिवसांत ७६ तालुक्यांचा दौरा करणे अत्यंत कठीण काम असल्याने आपण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधीही लढवणार नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आपली स्वतःची कोणतीही शाळा किंवा कॉलेज नसल्यामुळे अशा सभांमध्ये आपल्याला सर्वात शेवटी बोलायला उभे केले जाते, अशी खंत शिरसाट यांनी व्यक्त केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









