Share

शिवसेना चिन्ह प्रकरण: पक्षप्रमुखांच्या अमर्याद अधिकारांवरून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. वकील नीरज किशन कौल यांनी शिवसेनेतील पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षप्रमुखांच्या अधिकारांवर युक्तिवाद केला.

Published On: 

Supreme Court hearing Shiv Sena symbol case Shinde faction argument

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. निवडणूक आयोगाची निरीक्षणे मांडताना वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला की, तत्कालीन पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार देण्यात आले होते. यामुळे पक्ष आणि पक्षप्रमुख वेगळे करणे अशक्य झाले होते.

कौल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, २०१८ च्या पक्षघटनेनुसार सर्व पदाधिकारी नेमण्याचे अधिकार थेट पक्षप्रमुखांनाच मिळत होते. शिवसेनेची ही कार्यपद्धती आणि नेमणुकांची पद्धत पक्षांतर्गत लोकशाहीला धक्का लावणारी होती. १९९८ सालीच निवडणूक आयोगाने शिवसेनेला पत्राद्वारे पक्षातील नेमणुका लोकशाहीला धरून नसल्याचे कळवले होते, ज्यावर शिवसेनेने त्यावेळी उत्तरही दिले होते. आयोगाच्या निर्देशानुसार पक्षाने आपली कार्यपद्धती घटनेत नमूद करणे आवश्यक असून, २०१० च्या नियमांनुसार घटनेतील कोणताही बदल जनरल बॉडीकडून मान्य होणे बंधनकारक असल्याचेही कौल यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ‘प्रतिनिधी सभा’ सदस्यांकडून निवडण्याची प्रक्रिया पारदर्शक नसून ती लोकशाहीविरोधी असल्याचा दावा कौल यांनी केला. २०१८ च्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ सदस्य असणे आवश्यक असताना, शिवसेनेकडून केवळ ९ सदस्यांचीच नावे देण्यात आली होती. लाखो कार्यकर्ते असलेल्या पक्षात केवळ ९ सदस्यांची कार्यकारिणी असणे हा अत्यंत छोटा आकडा असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित पक्षघटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नसल्यामुळे आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर मर्यादा आल्या होत्या. पक्षघटनेबाबतच्या या सर्व त्रुटी आणि अपुऱ्या माहितीचा विचार करूनच, अखेर निवडणूक आयोगाने विधीमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारे शिवसेनेबाबतचा निर्णय घेतल्याचे कौल यांनी युक्तिवादात स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही