प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात आणि सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुणे येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी एका भावूक पोस्टद्वारे नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर हे आपले सर्वात मोठे आणि प्रामाणिक समीक्षक होते, अशी भावना शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी कॅमिओ केला होता.
‘गोलमाल अगेन’ चित्रपटातील कामासाठी स्वतः फी न घेता ती रक्कम एका अनाथ आश्रमाला दान करण्यास नाना पाटेकर यांनी सांगितले होते, अशी आठवण रोहित शेट्टीने सांगितली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “तुम्ही माझी फिल्म गोलमाल अगेनमध्ये कॉमिओ केला तो दिवस मी कधीही विसरणार नाही. मी तुम्हाला विचारलं, ‘दादा तुमची फी?’ तेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहिलं आणि म्हणालात, ‘तुझ्याकडून पैसे घेणार? एका अनाथआश्रमाचा नंबर देतो, तिथे डोनेट कर.’ ते तुम्हीच होतात, दादा. अगदी स्पष्ट, निखळ, उदार आणि खरे. तुमच्याकडून ‘शेट्टी’ ऐकणे मी नेहमी मिस करेन. मला तुमची आठवण येईल दादा.”
अभिनयासोबतच त्यांना खेळाचीही आवड होती. नाना पाटेकर वयाच्या १३ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायचे. ते लहानपणी ऑफ-स्पिन बॉलिंग करायचे आणि शिवाजी पार्कवर सराव करायचे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; अजित पवारांसोबतचा ‘तो’ प्रसंग पुन्हा चर्चेत
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया; व्हिडीओमध्ये थेट नाव न घेता म्हटलं ‘इव्हिल डेड’
- पुण्यात पीएमपी बसमध्ये चोरी; गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाची २ लाखांची सोनसाखळी लांबवली
Quick Answers
नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नाना पाटेकर यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता.
‘गोलमाल अगेन’मधील कामासाठी स्वतः फी न घेता ती रक्कम एका अनाथ आश्रमाला दान करण्यास नाना पाटेकर यांनी रोहित शेट्टीला सांगितले होते.
नाना पाटेकर वयाच्या १३ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायचे. ते लहानपणी ऑफ-स्पिन बॉलिंग करायचे आणि शिवाजी पार्कवर सराव करायचे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








