Share

‘मला अस्वस्थ वाटतंय…’, मध्यरात्रीच नानांनी मित्राला मेसेज केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता!

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणांचा घटनाक्रम समोर आला असून, डॉक्टरांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Published On: 

Nana Patekar Death Details

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आता समोर आलाय. गोव्यातील ज्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तिथल्या डॉक्टरांनी नानांच्या शेवटच्या क्षणांची अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली आहे.

रात्रीची वेळ होती, अचानक नानांना छातीत धडधडू लागलं. त्यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका जवळच्या मित्राला ‘मला अस्वस्थ वाटतंय…’ असा मेसेज केला. दुर्दैवाने, मित्राला तो मेसेज लगेच पाहता आला नाही. जेव्हा पहाटेच्या वेळी मित्राने फोन पाहिला, तेव्हा त्याने थेट नानांच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नानांना प्रचंड घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळले.

Nana Patekar Death

तातडीने केअरटेकर आणि मित्रांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याची धावपळ सुरू केली. रुग्णवाहिकेतून नेत असतानाच त्यांना सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल ४५ मिनिटं वैद्यकीय पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी झुंजत होतं. पण शेवटी नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.

पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केलं. मृत्यूसमयी त्यांच्या कुटुंबातील कुणीही जवळ नव्हतं, केवळ मित्र आणि केअरटेकर तिथे उपस्थित होते. सध्या त्यांचे पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने, आता नियमानुसार मेडिको-लीगल (Medico-Legal) प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नाना पाटेकर यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांच्या जवळच्या मित्राला ‘मला अस्वस्थ वाटतंय…’ असा मेसेज केला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही