शिवसेना चिन्ह वाद: ‘विधानमंडळ बहुमत हाच एकमेव मार्ग होता का?’, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेची समीक्षा केली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Published On: 

Supreme Court hearing on Shiv Sena party symbol dispute

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘निवडणूक आयोगाने दुसऱ्या पर्यायांना प्राधान्य द्यायला हवे होते की विधानमंडळातील बहुमताची चाचणी हाच एकमेव मार्ग होता?’, असा महत्त्वाचा सवाल न्यायालयाने दुसऱ्यांदा नीरज कौल यांना केला. या खटल्याची पुढील सुनावणी उद्या दुपारी २ वाजता होणार आहे.

न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या गुण-दोषांमध्ये दखल देत नाही, परंतु आयोगाच्या निर्णयापर्यंत जाण्याच्या प्रक्रियेची समीक्षा केली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पक्षचिन्हाशी असलेल्या ऐतिहासिक भावना आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पाहता निवडणूक आयोगाने सर्व परिणाम आणि पर्यायांचा योग्य विचार केला होता की नाही, हे न्यायालय तपासून पाहत आहे.

ज्येष्ठ वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू मांडली. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वाधिक भर देत निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य होता, हे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. २०१८ मध्ये शिवसेनेने पक्ष संविधानात बदल केला होता, मात्र निवडणूक आयोगाकडील दस्तऐवजानुसार या दुरुस्त संविधानाची प्रत आयोगाला दिलीच गेली नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. राजकीय पक्षांतर्गत लोकशाही महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी अर्जुन सिंह खटल्याचा दाखला दिला. निवडणूक आयोग निष्पक्ष असून तो केवळ वास्तव आणि पुराव्याच्या आधारे निर्णय देतो, त्यामुळे त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप निराधार असल्याचे कौल म्हणाले.

सुनावणीदरम्यान जस्टीस जॉयमाल्या बागची यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. सर्व जुने निर्णय १० व्या अनुसूचीच्या दुरुस्ती आधीचे आहेत आणि सुभाष देसाई खटल्यातही याबाबतचे रेकॉर्ड आहे, असे जस्टीस बागची म्हणाले. त्यांच्या या टिप्पणीमुळे नीरज कौल यांनी सादिक अली आणि अर्जुन सिंह प्रकरणांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही