Share

भाजप नेत्याच्या नातवाकडून मुलीला मारहाण? नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या गुंडगिरीच्या आरोपांना युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांनी भाजप नेत्याच्या नातवावर गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.

Published On: 

MPSC protest video controversy Pune BJP Navnath Ban Shivraj More

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: पुण्यात झालेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यात विद्यार्थ्यांपेक्षा आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोप केला. यासोबतच बन यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर रात्री मद्यपान करून रस्त्यावर गुंडगिरी करत असल्याचा आरोप लावला.

नवनाथ बन यांच्या या आरोपांना शिवराज मोरे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. परराज्यातील एका बड्या भाजप नेत्याच्या नातवाने ड्रग्जच्या नशेत एका मुलीला त्रास दिला आणि मारहाण केली असून, त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे. पीडित मुलगी ही आपल्या मित्राची बहीण असून, तिला मदत करण्यासाठीच आपण आदल्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण मोरे यांनी दिले.

हे प्रकरण भाजप नेत्याच्या नातवाशी संबंधित असल्याने ते दाबण्यासाठी आणि आपली बदनामी करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा दावा मोरे यांनी केला. महिलांच्या सुरक्षेची खरोखरच काळजी असेल, तर नवनाथ बन या प्रकरणात पोलिसांकडे कोणती कारवाई करण्याची मागणी करणार, असे खुले आव्हान त्यांनी दिले. तसेच, मुलींचे रक्षण करण्यासाठी कोणी गुंड म्हणत असेल तर आपल्याला पर्वा नाही, असे सांगत ‘नाईट लाईफ’ काय असते हे दाखवून देण्याचा इशाराही मोरे यांनी बन यांना दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या आंदोलनात विद्यार्थ्यांपेक्षा आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही