Share

‘कपिल शो’मध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; विनोदानंतर अजय देवगणची प्रतिक्रिया चर्चेत

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तुकाराम मुंढे यांच्यावरील विनोदानंतर अजय देवगण हसताना दिसला. अभिनेत्याच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

Published On: 

Ajay Devgn laughing after Tukaram Mundhe joke on The Great Indian Kapil Show

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: आपल्या आगामी ‘दृश्यम ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पोहोचला होता. या कार्यक्रमादरम्यान कृष्णा अभिषेक आणि टिकू शारदा या कॉमेडियन्समध्ये एक संवाद रंगला, ज्यामध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला.

यावेळी जयदीप अहलावतला उद्देशून टिकू शारदा म्हणाला की, तुकाराम मुंढे सतत फिरत असतात आणि ते कधीही येऊन छापा टाकू शकतात. यावर उत्तर देताना कृष्णा अभिषेकने ‘अरे, ते मिलावटवर छापा मारतात, अहलावतवर नाही,’ अशी टिप्पणी केली. तुकाराम मुंढे यांच्या नावावर झालेल्या या विनोदानंतर अजय देवगण स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवून हसल्याचे पाहायला मिळाले.

अजय देवगणने दिलेल्या या प्रतिक्रियेमागील नेमक्या कारणावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काही काळापूर्वी महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून पान मसाला आणि विमलच्या जाहिरातींशी संबंधित प्रकरणात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण तसेच टायगर श्रॉफ यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

सध्या अजय देवगण आगामी ‘दृश्यम ३’ या सिनेमामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. याआधी २०१५ मध्ये ‘दृश्यम’चा पहिला भाग, तर २०२२ मध्ये ‘दृश्यम २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अभिनेता अजय देवगण आपल्या आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पोहोचला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही