प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर : महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला गणेशोत्सव (Ganeshotsav) आता पूर्वीसारखा राहिलाय का? हा प्रश्न सध्या अनेकांना पडतो. याच मुद्द्यावर स्पष्टवक्ते अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) यांनी थेट बोट ठेवलं आहे. “राजकारण्यांकडून ज्या दिवशी स्पॉन्सरशिप मिळायला सुरुवात झाली, तेव्हापासून गणेशोत्सवाची पार माती झाली,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत त्यांनी सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य केलं. पूर्वीच्या काळी घरोघरी जाऊन दोन-पाच रुपयांची वर्गणी गोळा करण्यापासून ते आताच्या करोडोंच्या उलाढालीपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला. काही दिवसांपूर्वी ‘कलावंत’ ढोल-ताशा पथकाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर, आता जोशींच्या या नव्या विधानाने उत्सवाच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
Vidyadhar Joshi on Ganeshotsav
जुन्या आठवणींना उजाळा देताना विद्याधर जोशी म्हणाले की, “आम्ही घरोघरी जाऊन दोन, पाच, अकरा किंवा पंचवीस रुपये वर्गणी गोळा करायचो. उत्सव संपला की ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांच्यापर्यंत छापील हिशोब प्रामाणिकपणे पोहोचवला जायचा. पण हा सगळा पारदर्शी कारभार स्पॉन्सर्सच्या एंट्रीमुळे बिघडला.” इथूनच उत्सवाला वेगळं वळण लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
मंडळ चाळीत असो वा मोठ्या मैदानावर, विविध कंपन्या आणि विशेषतः राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या भरघोस स्पॉन्सरशिपमुळे उत्सवाचा मूळ गाभा हरवला आहे. हा प्रकार अतिशय घाणेरडा असून त्यामुळेच गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि साधेपणा नष्ट झाल्याचं रोखठोक मत जोशी यांनी मांडलं.
केवळ विद्याधर जोशीच नव्हे, तर इतर कलाकारांनाही हे बदल खटकत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रुती मराठे हिनेही ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत अशीच नाराजी व्यक्त केली होती. पंधरा वर्षांपूर्वी उत्सवात जो सुटसुटीतपणा आणि मजा होती, ती आता उरली नसल्याचं ती म्हणाली होती.
आज एका मंडळाच्या अवघ्या ६०० मीटरवर दुसरं मंडळ उभं राहतं. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि ढोल-ताशा पथकांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे या सणाला एक पूर्णपणे कमर्शियल अँगल आल्याचं श्रुतीने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे एकंदरच वाढत्या दिखावेगिरीवर आता कलाकारांमधूनच उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण होत असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप
- ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचे दिल्लीत आंदोलन; पोलिसांकडून खासदारांना मारहाणीचा आरोप
- ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?
Quick Answers
विद्याधर जोशी यांच्या म्हणण्यानुसार, राजकारण्यांकडून ज्या दिवशी स्पॉन्सरशिप मिळायला सुरुवात झाली, तेव्हापासून गणेशोत्सवाची पार माती झाली आहे.
पूर्वी घरोघरी जाऊन दोन, पाच, अकरा किंवा पंचवीस रुपये वर्गणी गोळा केली जायची आणि उत्सव संपल्यावर पैसे दिलेल्यांपर्यंत छापील हिशोब पोहोचवला जायचा; परंतु हा पारदर्शी कारभार स्पॉन्सर्सच्या एंट्रीमुळे बिघडल्याचे जोशी यांनी सांगितले.
श्रुती मराठे हिच्या मते, पंधरा वर्षांपूर्वी उत्सवात असलेला सुटसुटीतपणा आणि मजा आता उरलेली नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि ढोल-ताशा पथकांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे या सणाला कमर्शियल अँगल आल्याचे तिने म्हटले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









