Share

ऑक्टोबर हीटचा पचनसंस्थेवर परिणाम; उष्णतेपासून बचावासाठी ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

पावसाळा संपल्यानंतर वाढणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’मुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो; यापासून बचाव करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवून आहारात योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.

Published On: 

October heat health diet tips and precautions

प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: पावसाळा संपल्यानंतर अचानक हवामानात होणारे बदल आणि वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास जाणवू लागला आहे. या बदलत्या हवामानाचा आणि ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेचा थेट परिणाम मानवी पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसनसंस्थेवर होतो.

या वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना ॲसिडिटी, अपचन, गॅस, ब्लोटिंग, तसेच छातीत आणि पोटात जळजळ होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. या काळात हवेतील धूळ, धूर आणि पराग कणांमुळे खोकला किंवा घशात खवखव होण्याची शक्यताही वाढते. आयुर्वेदानुसार, ऑक्टोबर हीटच्या काळात शरीरातील ‘पित्त’ वाढण्याची शक्यता असते.

वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीर थंड आणि हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी थोडे-थोडे पाणी पीत राहावे आणि आहारात आवश्यक बदल करावेत. नारळ पाणी, ताक, ताजी फळे आणि हिरव्या भाज्या यांसारख्या थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदात थंड गुणधर्म असलेले फळ मानल्या गेलेल्या आवळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. तसेच, जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनास मदत होते आणि तोंडाला ताजेपणा मिळतो.

शरीरातील उष्णता आणि ॲसिडिटी वाढू नये यासाठी अति तिखट, तेलकट, तळलेले, आंबट आणि खारट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणे आणि मद्यपान टाळणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित हलका व्यायाम, चालणे (वॉक), योग आणि प्राणायाम करावा. मात्र, वातावरणात जास्त उष्णता असताना अतिशय दमवणारे व्यायाम प्रकार करणे टाळावेत.

वारंवार ॲसिडिटी, सतत ताप, छातीत दुखणे, सतत खोकला किंवा तीव्र पोटदुखी अशा समस्या जाणवत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःहून अँटिबायोटिक्स घेणे टाळावे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

ऑक्टोबर हीट आणि बदलत्या हवामानाचा थेट परिणाम पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसनसंस्थेवर होतो. यामुळे ॲसिडिटी, अपचन, गॅस, ब्लोटिंग तसेच छातीत व पोटात जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही