बीड: माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहविषयक नाव असलेल्या एका सोशल मीडिया पेजवर त्यांचा फोटो वापरून हा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुंडे यांच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. कार्यालयातील सुधीर सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (आयटी ॲक्ट) गुन्हा नोंदवला आहे. हा आक्षेपार्ह मजकूर नक्की कोणी पोस्ट केला, याचा शोध सध्या बीड सायबर पोलीस घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा
- MPSC आंदोलन: नवनाथ बन यांची रोहित पवारांवर सडकून टीका, केले गंभीर आरोप
- पतीची एन्ट्री अन् प्रियकराला घट्ट मिठी; वाराणसी रेल्वे स्टेशनजवळ भररस्त्यात हाय-व्होल्टेज ड्रामा
Quick Answers
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहविषयक नाव असलेल्या एका सोशल मीडिया पेजवर राजश्री मुंडे यांचा फोटो वापरून हा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
मुंडे यांच्या कार्यालयातील सुधीर सांगळे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









