प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी काल आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि ७० हजार नोकरभरतीबाबत आपली भूमिका मांडली. भाजप नेते नवनाथ बन यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी १९५० च्या कायद्याचा संदर्भ देत स्पष्ट केले की आयोगाच्या अध्यक्षांना हटवता येत नाही कारण त्यांना कायद्याने संरक्षण मिळते. तसेच, आयोगाच्या अध्यक्षांना त्यांचा राजीनामा केवळ राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडेच द्यावा लागतो, असेही नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
या सर्व मुद्द्यांवरून भाजप नेते नवनाथ बन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्यामुळे रोहित पवारांना आंदोलनासाठी बारामती आणि बारामती ॲग्रोमधून कार्यकर्ते आणावे लागले, असा दावा बन यांनी केला. रोहित पवार हे केवळ त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते म्हणूनच आमदार झाले, असा आरोपही त्यांनी केला.
नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर आणखी आरोप करताना म्हटले आहे की, त्यांनी बारामतीत उद्योगपती अदानी यांचे वाहन चालवून आपला स्वाभिमान गहाण ठेवला होता. यासोबतच आपल्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यासाठी रोहित पवारांनी २ कोटी रुपयांचे बजेट ठेवले असल्याचा दावाही बन यांनी केला. आपण २००४ साली काँग्रेसचे सरकार असताना बीडमधून अभाविपचे (ABVP) कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, असेही नवनाथ बन यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पतीची एन्ट्री अन् प्रियकराला घट्ट मिठी; वाराणसी रेल्वे स्टेशनजवळ भररस्त्यात हाय-व्होल्टेज ड्रामा
- रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा युवा संघ जाहीर
- माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल काढणार स्वतःचा पक्ष? मिर्झापूर किंवा बलियातून लढण्याची शक्यता
Quick Answers
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत.
भाजप नेते नवनाथ बन यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी १९५० च्या कायद्याचा संदर्भ देत आयोगाच्या अध्यक्षांना कायद्याने संरक्षण असल्याने हटवता येत नाही आणि त्यांना राजीनामा केवळ राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडेच द्यावा लागतो, असे स्पष्ट केले.
आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्यामुळे रोहित पवारांना आंदोलनासाठी बारामती आणि बारामती ॲग्रोमधून कार्यकर्ते आणावे लागले, असा दावा नवनाथ बन यांनी केला.
आपल्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यासाठी रोहित पवारांनी २ कोटी रुपयांचे बजेट ठेवले असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









