मुंबई: ठाकरे बंधूंच्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘गजनी’ संबोधले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत, “ब्रिटिश साम्राज्याला उतरती कळा लागली तेव्हा त्यांचाही मेंदू हलला होता, तसाच आता भाजपचा मेंदू हलला आहे,” अशी टीका केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चात लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा राऊत यांनी केला. या मोर्चाला आशिष शेलार यांनी ‘कोल्हेकुई’ म्हटल्यावरूनही राऊतांनी निशाणा साधला. “मोर्चाचे नाव गर्जना होते, पण ते कोल्हे असल्यामुळे त्यांना कोल्हेकुईच दिसणार. देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा होता आणि दिल्लीतही आंदोलनाची भीती असल्याने मोदी-शाह यांनी सशस्त्र दल तैनात केले आहेत,” असे राऊत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “न्यायमूर्ती भुइयां यांनी परखड मत मांडले आहे. कोट्यवधी नागरिकांनी मतांचा अधिकार गमावणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता फडणवीसांनी भुइयां यांनाही गजनी म्हणावे आणि ते राजकीय जमीन शोधत असल्याचे सांगावे.”
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचा दावा करत, लाखो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ती क्रांती असते, हे फडणवीसांना समजेल तेव्हाच ते केंद्रात सर्वोच्च पदी जातील, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. “ज्ञानेश कुमार, अमित शाह आणि सीमा खन्ना हे सर्वजण भूमिगत आहेत, त्यांनी लोकांसमोर यावे,” असे आव्हान त्यांनी दिले. उद्या मकरद्वारातून संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत सर्व विरोधी पक्ष चालत जाणार असून, आयोगाकडे पुरावे सादर करणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलिसांची धडक कारवाई: वाळू व मुरुमाची अवैध वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- वाळूमाफियांचा सुळसुळाट! गुन्हे शाखेचा छापा अन् २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सपोनि भरत मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
- उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर पाटील यांना पुन्हा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार
Quick Answers
संजय राऊत यांनी पलटवार करत म्हटले की, ब्रिटिश साम्राज्याला उतरती कळा लागली तेव्हा त्यांचाही मेंदू हलला होता, तसाच आता भाजपचा मेंदू हलला आहे.
राऊत म्हणाले की मोर्चाचे नाव 'गर्जना' होते, पण ते कोल्हे असल्यामुळे त्यांना कोल्हेकुईच दिसणार. तसेच हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असल्याचा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या माहितीनुसार, मकरद्वारातून संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत सर्व विरोधी पक्ष चालत जाणार असून आयोगाकडे पुरावे सादर करणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








