प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि हिंदवी पाटील (Hindavi Patil) या दोघी एकेकाळी एकाच मंचावर लावणीचा ठेका धरताना दिसायच्या. मात्र, आता त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. या दोघींच्या मैत्रीत अचानक मिठाचा खडा कसा पडला, याची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगत असते.
विशेषतः गौतमीच्या वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी या दोघींमध्ये झालेला वाद हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. आता याच बहुचर्चित प्रकरणावर स्वतः हिंदवी पाटीलने मौन सोडलं आहे.
एका ताज्या मुलाखतीत हिंदवीने त्या दिवशी नेमकं काय घडलं, याचा मोठा उलगडा केला आहे. गौतमीच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर गौतमीने हिंदवीचा हात झटकला आणि तिला तिथून चक्क हाकलून दिलं, अशा वावड्या काही महिन्यांपूर्वी उठल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना हिंदवीने सांगितलं की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्वच चर्चा शंभर टक्के खऱ्या नाहीत, पण त्यातला काही भाग नक्कीच खरा आहे.
Gautami Patil Hindavi Patil Controversy
त्या दुर्दैवी दिवशी हिंदवी गौतमीच्या सांत्वनासाठी तिथे पोहोचली होती. हिंदवीच्याच शब्दात सांगायचं तर, ती तिथे पोहोचली तेव्हा गौतमी नुकतीच अंघोळ करून बसली होती. हिंदवीने तिथे उपस्थित असलेल्या तिच्या आई आणि मामा-आजोबांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी गौतमी प्रचंड तणावाखाली होती. मीडियाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे तिला खूप त्रास झाला होता आणि ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती.
अशा कठीण परिस्थितीत कोणती व्यक्ती खरी आहे आणि कोणती खोटी, हे समजण्याच्या मनस्थितीत ती नव्हती, असंही हिंदवी म्हणाली. विशेष म्हणजे, याच प्रसंगामुळे तू ग्रुपमधून बाहेर पडलीस का, असा थेट प्रश्न विचारल्यावर हिंदवीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ‘असू शकतं, आता याबाबत काही सांगू शकत नाही,’ असं भावुक उत्तर देत तिने या विषयावर अधिक बोलणं टाळलं. त्यामुळेच आता या दोघींचे मार्ग वेगळे झाले असून, आज हिंदवीचा स्वतःचा वेगळा डान्स ग्रुप आहे आणि तिनेही अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं आता सामान्य बाब; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य
- विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवड्यात रवानगी
Quick Answers
सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्वच चर्चा शंभर टक्के खऱ्या नाहीत, पण त्यातला काही भाग नक्कीच खरा आहे, असे स्पष्टीकरण हिंदवी पाटीलने दिले.
हिंदवीने दिलेल्या माहितीनुसार, गौतमी त्यावेळी प्रचंड तणावाखाली होती, मीडियाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे तिला खूप त्रास झाला होता आणि ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती.
या प्रश्नावर हिंदवीच्या डोळ्यांत पाणी तरळले आणि ‘असू शकतं, आता याबाबत काही सांगू शकत नाही,’ असे भावुक उत्तर देत तिने अधिक बोलणे टाळले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








