Share

डिमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे मोजताय? ‘ही’ सोपी युक्ती वापरून वाचवा तुमचे पैसे

डिमार्टमध्ये खरेदी करताना कॅरी बॅगसाठी लागणारे अतिरिक्त पैसे कसे वाचवायचे आणि याविषयी ग्राहक आयोगाचा नियम काय सांगतो, हे जाणून घ्या.

Published On: 

DMart shopping bag money saving trick

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: घरातील किराणा आणि इतर साहित्य स्वस्तात मिळत असल्याने बहुतांश नागरिकांचा डिमार्टमध्ये खरेदी करण्याकडे कल असतो. यामुळे पैशांची मोठी बचत होते. मात्र, खरेदी केल्यानंतर सामान नेण्यासाठी ग्राहकांना अनेकदा २० रुपये देऊन कॅरी बॅग विकत घ्यावी लागते.

खरेदी केलेल्या सामानासाठी साधारणपणे दोन ते तीन पिशव्या लागतात. यासाठी ग्राहकांचे जवळपास शंभर रुपये खर्च होतात. मात्र, खरेदी करताना एका सोप्या युक्तीचा वापर केल्यास हे अतिरिक्त पैसे वाचवता येऊ शकतात.

डिमार्टमध्ये डाळ, तांदूळ आणि इतर कडधान्ये भरण्यासाठी ग्राहकांना मोफत कॅरी बॅग उपलब्ध करून दिलेल्या असतात. खरेदी करताना या पिशव्या मोठ्या आकाराच्या घेतल्यास, त्यात इतर सामानही सहज ठेवता येते. यामुळे वेगळी कॅरी बॅग विकत घेण्याची वेळ येत नाही आणि पैशांची बचत होते.

दरम्यान, दुकानाचा लोगो (चिन्ह) असलेल्या पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसे आकारण्यावर काही दिवसांपूर्वीच ग्राहक आयोगाने कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या पिशव्यांसाठी पैशांची मागणी करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

डिमार्टमध्ये सामान नेण्यासाठी ग्राहकांना अनेकदा २० रुपये देऊन कॅरी बॅग विकत घ्यावी लागते. साधारण दोन ते तीन पिशव्यांसाठी ग्राहकांचे जवळपास शंभर रुपये खर्च होतात.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही