Share

‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची पोलिसांकडून चौकशी; आमदार संजय गायकवाडांची मालमत्ता जप्तीची मागणी

आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी सुरू; कारवाईला आंबींचा बेकायदेशीर असल्याचा दावा.

Published On: 

Prashant Ambi and MLA Sanjay Gaikwad controversy over Shivaji Kon Hota book

कोल्हापूर, 2 ऑक्टोबर: ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांची कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहादीने मदत केली, याची चौकशी करण्याची मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. तसेच, आंबी यांची चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करावी आणि पुस्तक प्रकाशनाच्या परवानगीबाबतही तपास करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेली ही चौकशी बेकायदेशीर असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात कागदपत्रे पोलिसांना नव्हे, तर न्यायालयाने मागितल्यास तिथे सादर करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

यापूर्वी आमदार गायकवाड यांनी पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री फोन करून आंबी यांना आठ मिनिटांत ३६ शिव्या दिल्या होत्या, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठा संताप व्यक्त झाला आणि गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. वाढत्या वादानंतर गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

दुसरीकडे, गायकवाड यांनी दिलेल्या धमकीच्या वादानंतर पुस्तकाच्या विक्रीवर अनपेक्षित परिणाम झाला असून अवघ्या चार दिवसांत १० हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या या ७२ पानांच्या पुस्तकाच्या ३८ वर्षांत २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून, २४ भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. हे पुस्तक ‘लोकवाङ्मय’, ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘समाजवादी प्रबोधिनी’ आणि ‘साऊ प्रकाशन’ या चार संस्थांमार्फत प्रकाशित केले जाते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची चौकशी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही