बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नसतो. त्याच्या याच बेधडक स्वभावाची आणि हटके अंदाजाची कायम चर्चा असते. आता मात्र सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. त्याने चक्क राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचं नाव घेत आपल्या एका मैत्रिणीला चांगलाच दम भरलाय.
सलमानने त्याच्या एका मैत्रिणीला तिच्या नवीन कॅफेसाठी हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना त्याने कॅफेच्या स्वच्छतेवर बोट ठेवत तिला थेट तुकाराम मुंढेंच्या कारवाईची आठवण करून दिली. कोणाचेही नाव न घेता दिलेला हा प्रेमळ धाक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Salman Khan on Tukaram Mundhe
सलमानच्या एका मैत्रिणीने नुकतंच मुंबईतल्या वांद्रे भागात स्वतःचं एक नवीन कॅफे सुरू केलंय. या कॅफेची माहिती देताना सलमानने इन्स्टाग्रामवर एक भन्नाट पोस्ट लिहिली. “सृष्टी, माझी कॉफी रिफील करून दे यार.. पण किंमत वाढवू नकोस,” असं तो गमतीने म्हणाला.
यापुढे जात सलमानने तिला स्वच्छतेचाही कडक सल्ला दिला. “कॅफेची गुणवत्ता आणि स्वच्छता कायम राख, नाहीतर तपासणीसाठी मी थेट त्यांना (तुकाराम मुंढे) पाठवेन. आणि मग समजून जा,” असा मिश्किल इशाराच त्याने दिलाय. सोबतच ‘मी एक दिवस बीईंग ह्युमनचा टी-शर्ट आणि जीन्स घालून नक्की येईन’, असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी FDA चा पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. हॉटेल, बेकरी आणि कॅफेमधील अस्वच्छतेवर त्यांचा थेट बडगा उगारला जातोय. त्यांच्या याच धडाकेबाज कारवाईची दखल आता थेट बॉलीवूडपर्यंत पोहोचल्याचं सलमानच्या या पोस्टवरून स्पष्ट होतंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?
- ‘माजोरड्या, बिनडोक लोकांना…’; विद्यानंद बापटांवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री संतापली!
- Maratha Reservation : ‘शरद पवारांनी तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता’- भरत गोगावले












