मुंबई | किरण काळे पाटील : तब्बल तीन महिन्यापासून मराठवाड्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. आकाशातून पाण्याचा थेंबही नाही, खरिपाची पिकं करपू लागलीत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही आता पेटलाय. अशा भयंकर परिस्थितीत जगायचं कसं? हाच ज्वलंत सवाल घेऊन ‘अखिल भारतीय छावा संघटना’ थेट मुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) दरबारात धडकली आहे.
छावा संघटनेच्या नेत्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर आणि अनेक प्रलंबित मागण्यांवर थेट चर्चा झाली. विशेष म्हणजे, तब्बल दोन वर्षांपूर्वी घोषणा होऊनही अद्याप कागदावरच राहिलेल्या ‘क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील मराठवाडा आर्थिक विकास महामंडळा’ची तातडीने अंमलबजावणी करा, अशी आक्रमक मागणी या शिष्टमंडळाने केली.
‘कृत्रिम पाऊस पाडा…’; छावा संघटनेची सरकारला साद
सध्या मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांना चारा नाही. त्यामुळेच, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि मराठवाड्यात ‘कृत्रिम पाऊस’ पाडण्याची कार्यवाही करावी, असं साकडं निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आलं.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छावा संघटना आक्रमक
या भेटीवेळी संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील, राज्य सल्लागार भगवान दादा माकणे यांच्यासह बीडचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन, संभाजीनगरचे अशोक मोरे, लातूरचे दीपक नरवडे आणि जालन्याचे संदीप ताडगे हे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा आवाज असाच बुलंद राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘शासनाने वेळ काढू नये…’; मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या पैठणमध्ये ‘रास्ता रोको’चा इशारा!
- पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा; १५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
- ‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी’; शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






