Share

मतदार याद्यांवरून संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

SIR आणि मतदार याद्यांवरील आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Published On: 

Sanjay Raut meets Raj Thackeray

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मतदार याद्यांबाबत पुन्हा एकदा आक्षेप नोंदवले आहेत. त्यानंतर, ते थेट मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. हे दोन्ही नेते मतदार याद्या तसेच इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा करतील असे समजते आणि या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी SIR घोटाळ्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या नवी मुंबई कार्यालयात SIR चे बनावट अर्ज भरले जात होते. आपल्या बाजूने आपल्याला हवे असलेले मतदार एसआयआरच्या माध्यमातून ठेवायचे हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. जे मतदार त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात, अशा लोकांना यादीतून वगळायचे काम सुरू आहे.

Sanjay Raut meets Raj Thackeray

परिणामी, संपूर्ण SRA प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सतत नवनवीन युक्त्या लढवत असते. मग ती EVM मधील घोटाळा असो, पैसे वाटप असो, मतदार यादीतील अनियमितता असो किंवा सध्याचा SIR चा मुद्दा असो, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ठाकरे भेटीत काय चर्चा?

एसआयआर (SIR) आणि मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर लगेचच संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. राज ठाकरे यांनीही यापूर्वी SIR प्रक्रियेला विरोध दर्शवला होता, त्यामुळे राऊत त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

परिणामी, या दोन नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. भेटीबाबत ते कोणती माहिती देतात हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install