मुंबई – तुकाराम मुंढेंच्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. सध्या त्यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईने राज्यातील हॉटेल्सचे धाबे दणाणलेत. पण, याच धडक कारवाईवर ट्विंकल खन्नाने थेट मिश्किल टिप्पणी केलीय.
ट्विंकलने तिच्या ताज्या कॉलममध्ये मुंढेंच्या ‘फूड रेड्स’ची भन्नाट खिल्ली उडवली आहे. ३० ऑगस्टला तिने इन्स्टाग्रामवर या कॉलमचा काही भाग शेअर केला. यात तिने डोमिनोजसह बंद पडलेल्या शेकडो हॉटेल्सचा संदर्भ देत, रेस्टॉरंट्समध्ये पसरलेल्या भीतीवर अत्यंत खुमासदार भाष्य केलंय. “जिथे मुंढे जातात, तिथे मुंडक्या उडतात,” असा टोलाही तिने लगावला आहे.
‘ज्यांना मुघल पुसायचेत, त्यांनी आधी दुपारचं जेवण सोडावं’
“मुंढेंच्या कारवाईने प्रेरणा घेत मी माझ्याच किचनवर धाड टाकली. तेव्हा मला शाही मसाल्याचं असं पाकीट सापडलं, जे मुघल साम्राज्याच्या अस्तावेळीच एक्सपायर झालं होतं,” असा जबरदस्त पंच ट्विंकलने मारला. पुढे ती म्हणते, ज्यांना इतिहासातून मुघलांना पुसायचंय, त्यांनी आधी दुपारच्या जेवणातून सुरुवात करावी. कोफ्ता, कोरमा आणि कबाब खाणं आधी सोडावं.
रेस्टॉरंटमधला एक मजेशीर किस्साही तिने यात सांगितला आहे. ती एका हॉटेलमध्ये जाते आणि वेटरला विचारते, ‘मुंढेंनी तुमचं हॉटेल तपासलं का?’ वेटर म्हणतो, ‘हो मॅडम, गेल्या आठवड्यातच. आम्ही पास झालो.’ मग ट्विंकल बिनधास्त पनीर टिक्का मागवते. पण तो पनीरचा तुकडा थेट तिच्या मार्टिनीमध्ये पडतो. त्यावर ती नवीन ड्रिंक मागवण्याऐवजी त्याला ‘मुंढेंची मार्टिनी’ असं नाव देते. “जिन, वर्माउथ, ऑलिव्ह आणि पनीर… शेकन, नॉट स्टर्ड,” असा जेम्स बाँड स्टाईल डायलॉगही ती मारते.
थोडक्यात सांगायचं तर, ट्विंकलने नेहमीच्याच तिरकस शैलीत मुंढेंच्या कारवाईची दखल घेतली आहे. गंभीर विषयावर रोजच्या जीवनातील उदाहरणे देत तिने साधलेला हा निशाणा सध्या चांगलाच चर्चेत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!
- ‘RSS मुळेच भाजप सत्तेत’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई महापालिकेत सत्ता बदलणार? शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







