Eknath Shinde: मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अशातच परभणीत शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. पण, मनोज जरांगे पाटलांनी थेट बंडू जाधव यांना फोन लावला. ‘तुम्ही हा कार्यक्रम रद्द करा, नाहीतर मी माझं आंदोलन सोडून तिथे येईन’, असा थेट इशाराच जरांगेंनी दिला होता. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता पण अखेर एकनाथ शिंदे परभणीत पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
‘उद्या तुम्ही मला मारताल’, शिंदेंच्या समोरच जाधवांनी जरांगेंची माफी मागितली
पण भरसभेत भाषण करताना बंडू जाधवांनी मनोज जरांगे पाटलांची जाहीर माफी मागितली. त्यांची हतबलता सर्वांसमोर आली. ते म्हणाले, “आजचा कार्यक्रम नियोजित होता. मी जरांगे पाटलांचं मनापासून स्वागत करतो. पण, 11 वाजताचा कार्यक्रम असताना तुम्ही मला 11 वाजताच तो रद्द करायला सांगितलात. आता इथे आलेल्या हजारो लोकांना मी काय उत्तर देऊ? हे लोक मला मारतील आणि उद्या तुम्ही मला मारताल.”
“मी तुमचं सगळं काही स्वीकारतो, पण ऐनवेळी कार्यक्रम कसा रद्द करू?” असा सवाल करत जाधवांनी संवाद साधला. “तुम्ही मला बोललात तरी तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या प्रत्येक हाकेला मी नेहमीच ओ दिली आहे आणि उद्याही येईन. मनात कोणताही संकोच ठेवू नका. मी आणि शिंदेसाहेब कायम तुमच्यासोबतच आहोत. तरीही तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर माफी मागतो,” असं म्हणत जाधवांनी शिंदेंच्या समोरच जरांगेंची माफी मागितली आहे.
या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगताना जाधव म्हणाले की, सभेची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. आधी 7 जुलैची तारीख ठरली होती, पण शिंदेसाहेब आजारी असल्याने सभा पुढे ढकलली गेली. 1989 साली इथूनच आपण लोकसभा जिंकली आणि शिवसेना पक्षाला मान्यता व चिन्ह मिळालं, अशी आठवण सांगत परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिंदेंच्या उपस्थितीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर परभणीत नेमकं काय घडलं?
- ‘ते काही संत नाही… त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा’; दास, रंका आणि दिपकेंबद्दल सोनम वांगचुक यांचा मोठा गौप्यस्फोट
- ‘शिंदेंसोबत वेळ जुळल्यासच परभणीत येणार’; बंडू जाधवांवर भडकलेल्या मनोज जरांगेंचा थेट इशारा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







