छत्रपती संभाजीनगर : पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव (SP) यांच्या आदेशानुसार चिकलठाणा पोलिसांची एक टीम ‘ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन’वर होती. अंधाराचा फायदा घेत काही तस्कर ५ जिवंत गोवंशाची कत्तल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना एका खबऱ्याने दिली.
चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी वरुड काजी शिवारात धाड टाकून मोठ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सलमान आणि जावेद या दोन तस्करांना रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या ५ जिवंत जनावरांची सुखरूप सुटका करत त्यांना गोशाळेत दाखल केले आहे.
Chikalthana Police Beef Raid : प्राण्यांचा छळ आणि कत्तलीचा डाव
२८ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार चिकलठाणा हद्दीत रात्रीचे नाकाबंदी ऑपरेशन सुरू होते. यावेळी पोनि राजेंद्र बनसोडे, फिर्यादी पोउपनि संजय खंडागळे, हवालदार कोरडे, सास्ते आणि काळवणे यांचे पथक गस्तीवर होते. रात्री सव्वातीनच्या सुमारास त्यांना जालना रोडवरील हॉटेल काळे बंधूच्या मागे वरुड काजी शिवारात काही जनावरे कत्तलीसाठी आणल्याची गुप्त माहिती मिळाली.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता वरुड शिवारातील शेत गट क्रमांक ३२३ मध्ये धाड टाकली. तिथे एका लिंबाच्या झाडाखाली पाच गोवंश जनावरे चारा-पाण्याविना अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवली होती. बाजूलाच कत्तलीसाठी लागणाऱ्या ५ लोखंडी कुऱ्हाडी, ६ छोटे चाकू, एक सुरा आणि इलेक्ट्रिक वजन काटा असा ५ हजार रुपयांचा माल पडलेला होता.
पोलिसांनी तात्काळ तिथे हजर असलेले सलमान युसूफ खाँन (वय २३) आणि जावेद युसूफ खान (दोघे रा. वरुड काजी, गट नं. २३२) यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी एक पांढरा बैल आणि ४ वासरे असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा जिवंत गोवंश आणि ५ हजारांचे कत्तलीचे साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. जप्त केलेली सर्व जनावरे सुरक्षिततेसाठी चिकलठाणा गोशाळेत हलवण्यात आली आहेत.
याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी गोवंश तस्करांवर कडक कायदेशीर फास आवळला आहे. पोउपनि संजय खंडागळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या (कलम ५A(१), ९) सोबतच ‘प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०’ (कलम 11(1)(a), 11(1)(d), 11(1)(h)) अंतर्गत गुन्हा (FIR No. 0538) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सतीश देवकर करत आहेत. चिकलठाणा पोलिसांच्या कायदेशीररित्या भक्कम कारवाईमुळे पाच मुक्या जनावरांना जीवदान मिळालं असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’च्या दणक्यानंतर गोमांस तस्करांवरील कारवाया वाढल्या; पण चिकलठाणा, पाचोडसारखी धडक कारवाई MIDC पैठणमध्ये का नाही?
- पाचोड गोमांस कारवाई: १०० किलो मांस आणि ५ लाखांची टाटा सुमो जप्त! मुख्य आरोपी कुरेशी पळाला; मोबाईल उलगडणार तस्करीचे ‘कनेक्शन’
- गोमांस कारवाई! ६३ वर्षांचा वृद्ध एकटा २०० किलो गोमांस कसं कापू शकतो? पोलिसांचा ‘माफियांना’ वाचवण्याचा डाव?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











