Tukaram Mundhe FDA : तुमच्या मुलांच्या शाळेतील कॅन्टीनमध्ये अजूनही वडापाव किंवा कोला मिळतोय का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता राज्यभरातील शाळांच्या कॅन्टीनमधून जंक फूड कायमचं हद्दपार होणार आहे.
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शाळांनी या आदेशानुसार त्यांच्या कॅन्टीनच्या मेनूमध्ये मोठे बदल करायला सुरुवात केली आहे.
Tukaram Mundhe FDA Bans Junk Food in School Canteen
आता वडापाव, समोसा आणि कोल्ड्रिंक्सची जागा थेट इडली, डोसा, पोहे, शिरा, उपमा आणि ताकाने घेतली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली. “निरोगी पर्याय निवडणं सोपं असायला हवं,” असं त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे.
वडापावऐवजी इडली आणि कोलाऐवजी ताक हा बदल वरवर छोटा वाटत असेल. पण मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं. शालेय परिसरात जंक फूड विकण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे.
दुसरीकडे, शाळेच्या ५० मीटर परिसरात जास्त फॅट, साखर आणि मीठ (HFSS) असलेले पदार्थ कोणीही विकू शकणार नाही. जर कोणी नियम मोडला, तर थेट एफडीएकडे तक्रार करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. ग्रामीण भागात यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंचांची मदत घेण्यास सांगण्यात आलं आहे.
काही शाळांनी दुकानातून मिळणारे पाकीटबंद पदार्थ आणि गोड पेये हटवून त्याजागी चक्क ताजी फळे ठेवली आहेत. पालकांनीही या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं असून, आता खऱ्या अर्थाने मुलांच्या आरोग्याला प्राधान्य मिळत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











