ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय (Suresh Oberoi) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या भूतकाळातील राजकीय प्रवासाविषयी भाष्य केले. त्यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यांनी त्या काळातील आपले अनुभव, राजकारणात प्रवेश करण्यामागची कारणे आणि सध्याच्या राजकीय नेत्यांविषयीची आपली मते मोकळेपणाने मांडली.
२००४ मध्ये भाजपशी कसा संबंध आला हे त्यांनी सांगितले आणि कालांतराने सक्रिय राजकारणातील त्यांची रुची का कमी झाली, याचेही स्पष्टीकरण दिले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आपल्याला आजही आदर असल्याचे ओबेरॉय यांनी नमूद केले.
Suresh Oberoi on politics and BJP
राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाबद्दल सुरेश ओबेरॉय यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “हैदराबादमधील कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता. एकेदिवशी तो घरी आला आणि मला म्हणाला, ही भारतीय जनता पार्टी आहे. तू त्यात सामील व्हायला पाहिजेस. ही २००४ सालची गोष्ट आहे”
२००४ मध्ये भाजपशी जोडले गेल्यानंतर, त्यांनी पक्षाच्या प्रचार मोहिमेतही सहभाग घेतला. या काळात त्यांची लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांशी भेट झाली.
मात्र, आपल्या गुरूंची भेट झाल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाने वेगळे वळण घेतले. या मुलाखतीत ओबेरॉय यांनी सांगितले की राजकारणात न उतरण्याचा सल्ला त्यांच्या गुरूंनी त्यांना कटाक्षाने दिला होता.
“त्यांनी मला खूप कडक शब्दांत सुनावलं. मी माझ्या आयुष्यात त्यांना कोणालाही असं सुनावताना कधीही पाहिलं नव्हतं. ते मला म्हणाले, काळजी घे. राजकारणात कधीही जाऊ नकोस आणि या लोकांशी संपर्कसुद्धा ठेवू नकोस”, असं ओबेरॉय म्हणाले. राजकारणातील प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ओबेरॉय यांच्या मनात काही वेगळे प्रश्न निर्माण झाले.
ओबेरॉय यांनी सांगितले की, “मला आतून आनंद वाटत नव्हता. माझं मन त्यात रमत नव्हतं. मला तिथे चांगली ऊर्जाही जाणवत नव्हती. मोदीजी, अमित शाह, योगी आदित्यनाथजी आणि इतर काही जणांबद्दल मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्या अनेक लोकांबद्दल मला काहीतरी विचित्र वाटलं.”
“ते मला खरे वाटले नाही. मला वाटायचं की राजकारण म्हणजे देशासाठी काहीतरी करणं. नंतर माझ्या लक्षात आलं की बहुतेक लोकांना फक्त पैसे कमवण्यातच रस असतो”, असे स्पष्ट मत ओबेरॉय यांनी मांडले.
या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतची (RSS) आपली भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी मोहन भागवत यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला आणि आपण त्यांचे चाहते असल्याचेही नमूद केले.
याविषयी ते पुढे म्हणाले की, “मी नेहमीच आरएसएसचा आणि मोहन भागवतजींचा चाहता राहिलो आहे. ते एकदा माझ्या घरी नाश्त्यासाठी आले होते. माझी पत्नी खूप छान हलवा बनवते. आम्ही त्यांना तो दिला आणि त्यांनाही तो खूप आवडला होता. मी आजही भागवतजींच्या संपर्कात आहे. पण मी आरएसएसमध्ये औपचारिकपणे सहभागी झालेलो नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘वंदे मातरम्’वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; अमित शाह म्हणाले, “तुष्टीकरण सहन करणार नाही”
- ‘लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार’; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
- राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवार-पार्थ पवारांची 3 तास बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











