मुंबई : उद्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजांमधील तणावाचे रूपांतर दंगलीत झाले, तर त्यासाठी उदय सामंत (Uday Samant) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) हे दोन नेते जबाबदार असतील. हे दोन्ही नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना आर्थिक मदत देऊन हा मुद्दा तापवत ठेवत आहेत, असा आरोप ओबीसी कार्यकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली.
उदय सामंत आता उपमुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे तो मनोज जरांगे याला भुंकायला सांगत आहे. सुपारी देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टार्गेट करायला सांगत आहे.
Navnath Waghmare on Prasad Lad & Uday Samant
एकनाथ शिंदे यांनी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला जवळ केले. पण आता मनोज जरांगे त्यांच्यावरच उलटला आहे. उदय सामंत सतत उपमुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहेत. लवकरच उदय सामंत हे भाजपवासी झालेले दिसतील, असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला.
उदय सामंत यांचा यापूर्वीही भाजपशी संपर्क होता आणि हे शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत होते. शिंदे गटात सामंत अस्वस्थ आहेत. उद्योगमंत्री असताना, ते मनोज जरांगे यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलण्यासाठी चिथावणी देत आहेत आणि त्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये पुरवत आहेत, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व कमी होईल. सामंत यांची योजना पुढे जाऊन शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पाडण्याची आहे, असा गौप्यस्फोट वाघमारे यांनी केला.
त्याचप्रमाणे, प्रसाद लाड यांना मंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहे. मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तेव्हा ते त्वरित प्रतिक्रिया देतात, पण त्याच वेळी जरांगे यांना पाठिंबा देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने प्रसाद लाड यांना अनेक कंत्राटे दिली आहेत, ज्यामुळे त्यांना प्रचंड संपत्ती जमा करता आली आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “राज्य सरकारनेच या ‘सापाला’ पोसले आहे, तोच आता त्यांना डसतोय, उद्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल झाली तर उदय सामंत-प्रसाद लाड हे दोन नेते जबाबदार असतील. तेच मनोज जरांगे यांना रसद पुरवत आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण हे दोघे कुठे जातात यावर सरकारने लक्ष ठेवावे.”
“या दोघांनी रसद पुरवली नाही तर मनोज जरांगे काहीच करु शकत नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड या दोघांना पुढे केले जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांनी या दोघांपासून सावध राहिले पाहिजे.” असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘निर्लज्ज लोक आहेत, यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे’ : संजय राऊत
- पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘दोन-चार लोकांना रिटायर केल्यावर…’
- चर्चगेटमधील Income Tax कार्यालयाला भीषण आग; इमारतीत धुराचे लोट, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











