Share

चर्चगेटमधील Income Tax कार्यालयाला भीषण आग; इमारतीत धुराचे लोट, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

चर्चगेटमधील आयकर विभागाच्या कार्यालयाच्या बेसमेंटला आग लागल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

Published On: 

Churchgate Income Tax office fire

मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चर्चगेट (Charchgate) स्टेशनजवळील आयकर विभागाच्या ( Income Tax) कार्यालयात आग (Fire) लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे आठ गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी आणि ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न (Rescue Operation) करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चर्चगेट स्टेशनजवळील आयकर कार्यालयाच्या परिसरात दाट धूर पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आग लागली तेव्हा कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित होते, परंतु धोक्याची सूचना मिळताच त्यांना त्वरित बाहेर काढण्यात आले.

Churchgate Income Tax office fire

यामुळे काही काळ धावपळ उडाली. आत कोणी अडकले नाही ना, याची खात्री करण्यासाठी अधिकारी तपासणी करत आहेत, तर अग्निशमन दल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

चर्चगेट स्टेशनजवळ आयकर विभागाचे मोठे कार्यालय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी इमारतीच्या तळमजल्यावर ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि ती वेगाने भडकली.

आग वाढल्यामुळे आणि हळूहळू संपूर्ण तळमजल्यावर पसरल्यामुळे कार्यालयातून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडताना दिसले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी त्वरित आग विझवण्याचे काम सुरू केले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

आयकर कार्यालयातील प्रत्यक्षदर्शींनी या भयावह परिस्थितीचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की, एक तासाभरापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. शॉर्ट सर्किटचे कारण म्हणजे, जेव्हा वायर पेटते, तेव्हा त्या वायरीचा वास येतो. त्या धुराचा वास आला आणि समजले की आग लागली आहे, असे एकाने सांगितले.

या कार्यालयातील बेसमेंटमध्ये १० नंबर रूमला आग लागली आहे, मात्र सुदैवाने ही आग अजून पहिल्या माळ्यापर्यंत वगैरे पोहोचलेली नाहीये, ना तळ मजल्यावर. इन्कम टॅक्स कार्यालयाला खाली बेसमेंट आहे, तिथल्या दहाव्या रुमला आग लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्ती पहिल्या मजल्यावर अडकल्या होत्या, जे कर्मचारी नव्हते, परंतु भीतीपोटी एका खोलीत आश्रय घेऊन बसले होते. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान इनकम टॅक्सच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही जण अडकले आहे. त्यांचे अग्निशमन दलाच्या जवानकडून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. आगीच्या तीव्रतेमुळे चहूकडे धुराचे लोट असून काळ्या धुराचे आच्छादन तयार झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही